<
जळगाव-(जिमाका) :- जिल्ह्यात मुलींचे प्रमाण वाढावे याकरीता ज्या कुटूंबाला एक किंवा दोन मुली आहेत. अशा कुटूंबाचा सत्कार करण्यात यावा. तसेच ज्या गावात मुलींची संख्या जास्त अशा ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात यावा. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्यात.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी, 2020 या कालावधीत राष्ट्रीय बालीका दिनानिमित्ताने विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत राबवावयाच्या उपक्रमांची नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न् झाली, यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना दिल्यात. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोळे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. ठोंबरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी श्री. तडवी यांचेसह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ढाकणे म्हणाले की, राष्ट्रीय बालीका सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घ्यावी.
राष्ट्रीय बालीका सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यात 20 जानेवारी रोजी जिल्हा व तालुकास्तरावर स्वाक्षरी मोहिम राबविणे तसेच शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 21 जानेवारी शाळा, महाविद्यालयांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओबाबत रॅली व प्रभात फेरीचे आयोजन, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्याव्दारे दारोदार योजने प्रसिध्दी, घरांवर तसेच शासकीय कार्यालयांच्या दारांवर योजनेचे पोस्टर्स चिटकवणे. 22 जानेवरी रोजी स्लोगन, पेंटींग, चित्रकला, एकांकिका, निबंध, रांगोळी स्पर्धांचे शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ यावर आधारीत सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या भिंतीवर भित्तिचित्र स्पर्धां घेणे. 23 जानेवारी रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओवर आधारित सामाजिक बैठक घेणे, धार्मिक, सामाजिक प्रतिनिधी यांच्यामार्फत संवेदनशील विषयावर कार्यक्रम घेणे. गुडटच, बॅडटच (Good touch, Bad touch) याबाबत शालेय विद्यार्थ्याशी संवाद साधणे. 24 जानेवारी रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारित चित्रपुस्तिका प्रकाशीत करणे,पथनाट्याचे आयोजन करणे. चित्रपट, पपेट शो चे आयोजन करणे. जिल्हा व ग्रामीण स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलीच्या नावे झाडे लावणे. 25 जानेवारी रोजी मुलींचे लिंग गुणोत्तर व बालकांची काळजी विषयावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करणे. आरोग्य व पोषण तसेच पीसीपीएनडीटी विषयावर व्याख्याने, कार्यशळा आयोजित करणे. आणि 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील मुलींची संख्या जास्त असणाऱ्या ग्रामपंचातींच्या सत्कार करणे. उत्कृष्ठ काम करणऱ्या महिला, मुली, शाळा व्यवस्थापण, आदर्श महिला ग्रामपंचायत कमिटी, संस्था, आशा, अंगणवाडी सेविका, क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिती ब बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिली.
जिल्ह्यातील नागरीकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.