<
बंजारा भटके विमुक्त समाजाचे प्रश्न तातडीने सोडविले नाही तर हरपणी ब्रिगेड विद्यमान आमदारांना चोळी बांगडीचा (फेटिया काचळीचा ) पेहराव भेट देणार-जिजा राठोड
चाळीसगाव (प्रतिनिधी) बंजारा भटके विमुक्त समाजाचे प्रश्न तातडीने सोडविले नाही तर हरपणी ब्रिगेड विद्यमान आमदारांना चोळी बांगडीचा (फेटिया काचळीचा ) पेहराव भेट देणार .अशा निर्धार हरपणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा जिजा राठोड यांनी केला.
भारत स्वतंत्र होऊन आज पाऊणशे वर्षे झालीत तरी बंजारा व एकूणच सर्व भटके – विमुक्त जाती – जमातींवर शासकीय स्तरावरून सतत अन्याय -अत्याचार होत आहेत. शासनाकडून पदरात पडणारा सततचा दुजाभाव असह्य होऊन शासनाच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध बंजारा समाजातील महिलांनी एकजूट होऊन आता कंबर कसली आहे. ज्या भटक्या – विमुक्तांत जाती-जमातींच्या मतदानांच्या बळावर आपण निवडून येता, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवता, त्या बंजारा व भटके विमुक्त जाती – जमातींचे प्रश्नच आपणास अजून कळले नाहीत. चुकून कळले तरी जाणीवपूर्वकच आपण त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करीत आहात, असा आमचा स्पष्ट आरोप हरपणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा जिजा राठोड यांनी केला. आपण या गंभीर विषया कडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने आम्हाला आमच्याकडे असलेले इतर सशक्त पर्याय वापरावे लागतील. ती वेळ येण्यापूर्वीच आपण सावध व्हा. नवीन शैक्षणिक धोरणात आपण उपरे ठरलो. नॉन क्रिमिलेअरचा प्रश्न आहेच. भटक्या – विमुक्त जाती – जमातींचे आरक्षण जवळजवळ संपुष्टात आलेले आहे. स्वतंत्र अनुसुचीच्या मुद्यावर तर न बोललेलेच बरे. असे शेकडो प्रश्न आहेत. प्रश्नांची सोडवणूकच आजवर तुम्ही केली नाही म्हणून प्रश्नांची संख्या गणिती पद्धतीने वाढत गेली. आजही सन्मानाचे जगणे या जाती – जमातींना मिळत नाही, ही मोठीच शोचनीय बाब आहे.
संविधानाची आणि लोकशाहीची ताकद ओळखा आणि आम्हाला आमच्या न्याय्य मागण्यांच्या परिपूर्तीसाठी हाक द्या. आम्ही सर्वसामर्थ्यानिशी आपल्या सोबत आहोत. भटक्या – विमुक्तांचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या खालील मागण्या शासनदरबारी पोहोचवून बंजारा समाजाला न्याय द्यावे, सदर कार्यक्रमाच्या अधक्षा तथा हरपणी ब्रिगेडच्या प्रमुख सल्लागार डाँ संयोगिताताई नाईक पुणे ह्या होत्या.त्यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात सांगितले की , लघुद्योगाच्या माध्यमातुन महिलांचे आर्थिक सबलीकरण घडवुन आणावे .बंजारा समाजाची पारंपारीक वेशभुषा टिकवुन ठेवणेसाठी बंजारा महिलांनी कसिदाकारीकडे वळावे त्यांना औद्योगिक व तंत्रग्यानाचे शिक्षण द्यावे तसेच बंजारा महिलांनी सुध्दा आपल्या घरामध्ये शिक्षणाला महत्व देऊन आपल्या मुलांना बौध्दिक द्रुष्ट्या सक्षम करावे असा संदेश दिला, तर हरपणी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्या तथा कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या नंदाताई मथुरे नाशिक यानी बंजाराना आदिवासीचा दर्जा देणे , क्रिमिलिअरची अट रद्द करावी या विषयी चर्चा केली .तसेच हरपणी ब्रिगेडच्या उपाध्यक्षा व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मिनाक्षीताई चव्हाण यांनी महिलांना सक्षम करणेसाठी सरकारने बिनफेडीचे कर्ज द्यावे असे मत व्यक्त केले . हरपणी ब्रिगेडच्या प्रमुख संघटक व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डाँ सुजाताताई आडे धुळे यांनी वसंतराव नाईक महामंडळाची आर्थिक तरतुद वाढवुण मिळणे बाबत मार्गदर्शण केले
बंजारा व भटक्या विमुक्त जाती जमातींना न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी अन्नपुर्णाताई राठोड यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
या वेळेस त्यांनी खालील मागण्या केल्या आहेत.
१) मूळ भटक्या – विमुक्त जाती – जमातींना अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) सवलती देण्यासाठी केंद्राकडे तशी शिफारस करून केंद्र सरकारला त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे.
२) आदिवासी आणि धनगर समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या अर्थ संकल्पामध्ये विशेष तरतूद करणे.
३) बंजारा समाजाच्या विकासासाठी पुरवणी अर्थसंकल्प सादर करून १०००० रु. कोटीची तरतूद करण्यासंदर्भात शासनाकडे त्वरित शिफारस करावी. तसेच मूळ भटक्या -विमुक्तांनादेखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात वाटा द्यावा.
४) क्रिमिलियरची जाचक अट त्वरीत रद्द करावी.
५) कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन निर्माण करावे.
६) शासकीय योजनांमध्ये महिला धोरणांची अंमलबजावणी करून महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय पूर्णत्वास न्यावे.
७) तालुका स्तरावर बंजारा व भटके विमुक्त मुला-मुलींसाठी मोफत शिक्षणाची व वसतीगृहाची सोय करावी.
८) ऊसतोड कामगारांच्या व कष्टकरी महिलांच्या प्रश्नांकडे शासनाने विशेष लक्ष पुरवावे. त्यांच्या हिताच्या तरतुदी कराव्यात.
९) संपूर्ण गोरबंजारा समाजाला आदिवासी (ST) सूचीमध्ये समाविष्ट करण्याकरिता क्रेंद्राकडे १९७५ च्या दरम्यान सुपूर्द केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करवावूनST प्रवर्गात बंजारा जमातीचा समावेश करावा.
१०) तीनशे लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी.
११) बंजारा महिलांना पारंपरिक कशिदाकारीसाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी बिनफेडीचे अर्थसहाय्य द्यावे.
१२) बंजारा व भटके – विमुक्त तरुणांना नि:शुल्क औद्यौगिक प्रशिक्षण (आई.टी.आय. व अभियांत्रिकी) देऊन उद्योग धंद्यांसाठी त्यांना ( लघुउद्योग व कुटिर उद्योग)अर्थसहाय्य करावे.
१३) स्वतंत्र भाषा, वेशभूषा, पेहराव आणि स्वतंत्र संस्कृती असलेल्या बंजारा बोलीभाषेला आठव्या सूचीत समाविष्ट करण्याकरिता क्रेंद्राकडे शिफारस करावी.
१४) मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या अडीच एकर जागेत बंजारा व भटके – विमुक्त जमातींच्या तरुणांसाठी IIM, IIT, IAS, IPS, Ph.D. या व अशा उच्च शिक्षणाची सोय करावी. तिथे संशोधन केंद्रे स्थापन व्हावे.
१५) शिक्षण, उद्योग व माहिती – तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात प्रत्येक तांड्याचे रस्ते हे शहरांना आणि मोठ्या उद्योगांना जोडले जावेत.
१६) बंजारा जमातीतील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणाकरिता / परदेशी शिक्षणाकरिता स्वतंत्र शिष्यवृती मिळावी.
१७)नागपूर येथील नियोजित महानायक वसंतरावजी नाईक स्मृती सभागृहाचे काम त्वरीत सुरू करून ते पूर्णत्वास न्यावे.
१८) तुर्तास होत असलेल्या विजा-अ च्या आरक्षणामध्ये घुसखोरी करीत असलेल्या बोगस राजपूत-भामटा व छप्परबंदचा बंदोबस्त करून खऱ्या मूळ भटक्या – विमुक्तांना न्याय द्यावे.
१९) वसंतराव नाईक महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यांच्या रोजगाराची व स्वावलंबनाची सोय करावी.
२०) बंजाराबहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या भाषाविज्ञान व भाषाअध्ययन विभागात गोरबोली भाषेचा समावेश करावा.
२१) (वि.जा. / भ.ज.) आश्रमशाळेला नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत करून तिथे शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचवावा.
२२) कु. सीमा राठोड व एकूणच भटके-विमुक्त समाजातील मुलींवर होणा-या अत्याचाराची न्यायालयीन बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी.
२३)राईनपाडा हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना अद्याप कोणत्याही प्रकारची शासकीय मदत करण्यात आलेली नाही. घटनाप्रसंगी जाहीर केलेली १० लाख रु. रोख रक्कम व पीडित कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी देण्याच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी.
वरील ज्वलंत प्रश्नांची समस्यांची तातडीने सोडवणूक न केल्यास आम्ही सर्व हारपणी ब्रिगेडच्या महिलांतर्फे आपणास बंजारा समाजाच्या महिलांची वेशभूषा, बांगडी , चोळी परिधान करू. (फाटो फेटिया, काचळी, पचेडी, बलीया) व दीड कोटी बंजारा व दोन कोटी भटके – विमुक्त अशा साडेतीन कोटी समाजबांधवांच्या लक्षात आणून देऊ की सरकार आपल्या बाजूने आहे की आपल्या विरुध्द बाजूने आहे. या वेळी जळगाव ,धुळे ,नंदुरबार ,नाशिक ,औरंगाबाद पुणे आदि अनेक जिल्यातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ भारती नरेन्द्र पवार माजी सरपंच, सौ मिराबाई चव्हाण, सौ शानोबाई चव्हाण, सुरेखाबाई, सौ संध्या ताई चव्हाण, सुमन बाई ,उषा राजाराम गोगने ,सुरेखा रमेश सोनार (कडेल)संगिता अशोक वर्मा यांनी परिश्रम घेतले .