<
जळगाव(प्रतिनिधि):- तुम मुझे खून दो में तुम्हे आजादी दूंगा असे भारतीयांना आव्हान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज 123 व्या जयंती निमित्त त्यांना प्रगती विद्यामंदिर शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षक मनोज भालेराव व विद्यार्थी आदित्य धुमाळ,पंकज पाटिल व प्रणव महाले यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी सुभाषबाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते.ते नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.अशा शब्दात त्यांचे कार्य सांगितले.तदनंतर शिक्षक मनोज भालेराव यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना उजाळा दिला व आपले मनोगत मांडले.कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोर्णिमा थोरात तर आभार मिलिंद वाणी या विद्यार्थ्यांनी केले.
या प्रसंगी शिक्षक संध्या अट्रावलकर, रमेश ससाने,पंकज नन्नवरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण उपस्थित होते.