<
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे (पोकरा) या योजनेत समाविष्ठ झालेल्या गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यास निश्चितपणे मदत होणार असल्याने या गावातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) तिसऱ्या टप्प्यातील समाविष्ठ गावांतील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांच्याकरीता प्रकल्पाची तोंडओळख व रुपरेषाबाबत जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, रमेश पाटील, राजेंद्र चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, लहरी हवामानाच्या काळातही नशीबावर अवलंबुन राहून येईल त्या अडचणीवर मात करणारा माझा बळीराजा आहे. त्याच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी दुय्यम व्यवसायाकडे वळाले पाहिजे. याकरीता पोकरा प्रकल्पांत अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावाच्या सरपंचानी पोकरा योजनेचा लाभ आपल्या गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होवू नये यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरीकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावेत, याकरीता कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये सौरउर्जेवर पंप बसविण्याची योजना राबविण्यात येईल. पोकरा प्रकल्पात व जिल्ह्यातील कृषि विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषि मंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, गावातील शेतकरी सक्षम होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. पोकरा प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेऊन आपली प्रगती साधण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी सादरीकरणाद्वारे पोकरा प्रकल्पांची माहिती व परिचय करुन दिला. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी समाधान पाटील, रविंद्र महाजन यांना राज्य शासनाचे कृषि पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल तर कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांना माऊली पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच या प्रकल्पात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कृषि विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार देसाई यांनी सुक्ष्म नियोजन आणि सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची कार्यपध्दती, दादाराव जाधवर यांनी सामाईक जमिनीवरील मृद व जलसंधारण कामांच्या अंमजबजावणीची कार्यपध्दती, संजय पवार यांनी वैयक्तिक लाभाचे घटक व शेतकरी गट/ कंपन्यांसाठीचे घटक व अंमजबजावणीची कार्यपध्दती, चंदन मुळे यांनी विविध गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत कृषि व्यवसाय बळकटीकरण या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रकल्पाच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीन मतदार दिनानिमित्त पालकमंत्र्यांसह उपस्थितांनी लोकशाही बळकटीकरणाची शपथ घेतली. या कार्यशाळेस पोकरा प्रकल्पात समाविष्ट गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार यांनी मानले.
योजना चांगली आहे
त्यावर स्थगिती देण्यात आली
का ??
nahi