<
जळगाव दि.30 –आय एम आर मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत रोटरॅक्ट क्लब आय एम आर तर्फे विविध कारेक्रम घेतले गेलेत. त्यात प्रामुख्याने *”क्लायमेट पे बात” (चर्चासत्र) तसेच पोस्टर तथा मॉडेल प्रेझेन्टेशन* स्पर्धा घेण्यात आल्याहोत्या. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. मिनीनाथ दंडवते (जळगाव मनपा उपायुक्त),प्रा.एस.आर.थोरात(संचालक,पर्यावरण व भूगर्भशास्त्र प्रशाळा, KBCNMU), प्रा डॉ शिल्पा बेंडाळे(संचालिका,IMR कॉलेज) आणि आय एम आर रोटरॅक्ट अध्यक्ष प्रणील चौधरी यांची होती. याप्रसंगी प्रस्तावना करतांना प्राचार्य डॉ बेंडाळे यांनी सांगितले “पर्यावरण आणि स्वच्छता याचा जवळचा संबंध आहे. प्रत्येकाला खुल्या हवेत श्वास घेता यावा म्हणुन आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता करतांना पर्यावरण पुरक पध्दत वापरली गेली पाहिजे.” त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिलेले मा. मिनीनाथ दंडवते(जळगाव मनपा उपायुक्त) यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की” बाहेरचे देश बघितले तर आपल्याला स्वच्छतेची किंमत आणि महत्त्व कळते. पण तसा अवेअरनस आपण आपल्या देशात दाखवत नाही. सध्या उन्हाची तीव्रता तुम्ही अनुभवता आहात.. वातावरणातील बदलामुळे ही तीव्रता जास्त आहे. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त झाडे लावण्याचे उपक्रम किती लोक करतात. दैनंदिन जीवनाशी थेट निगडित नसतील असे पण दूर दृष्टीने बघितले तर अनेक गोष्टींचा सखोल विचार केला गेला पाहिजे. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुज्ञ नागरीकांच्या मदतीने सॅनीटरी नॅपकीन संदर्भात केलेली उपाययोजना, स्वयंस्फूर्तीने उभारलेले चॅनेल याविषयी विस्ताराने सांगितले. तसेच प्राणवायू आणि पाणी यांची येणार्या काळातील जाणवणारी कमतरता, वाहनाची वाढलेली संख्या, Prastic चा वापर. दवाखान्यातील वाढती गार्दी..यावरही विस्तृत विवेचन केले. त्यानंतर प्रा.एस.आर.थोरात
(संचालक,पर्यावरण व भूगर्भशास्त्र प्रशाळा, KBCNMU) यांनी “आपण काय आणि किती महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित करतो हे गांभिर्याने बघितले पाहिजे.” क्लीन डे हा रोजच झाला पाहिजे. ती सहज होणारी गोष्ट असली पाहिजे “त्यानंतर झालेल्या परीसंवादातील तरुण वक्ते: श्रेयस पाटील(पर्यावरण कार्यकर्ता आणि ssbt महाविद्यालयातील सिव्हील इंजिनियरिंगचा विद्यार्थी म्हणाला, “इंडस्ट्रीअल कचर्याचे वितरण नीट केले पाहिजे. साॅलीड वेस्ट ची मॅनेजमेंट महत्वाची आहे. प्लास्टिक ला पर्याय शोधला पाहिजे.इलेक्ट्रॉनिक रिसायकलही नीट करावे लागेल. त्यासाठी शास्त्रशुद्ध वर्गीकरण करणारा नवा भंगारवाला निर्माण झाला पाहिजे. ” तर गिरीश घनःशाम पाटील (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य युवा छात्र संसद आणि एम जे काॅलेजचा विद्यार्थी आपला विषयाची मांडणी करतांना “ग्रेटाची चळवळ आणि पर्यावरण संवर्धन.. यावर विस्ताराने बोलला. त्याने आपण कोण..? हा प्रश्न उपस्थित करुन, आपण नव्हतो तेव्हाही पर्यावरण अस्तित्वात होते आणि आजही आहे आणि आपण नसु तेव्हा ही पर्यावरण असेल.. त्यामुळे ही माणुस वाचवण्याची चळवळ आहे.. हे संकट फार भिषण आहे आणि “आपण चलता है” असे वागतो आहे. आव्हाण्याचा वाळू उपसण्याचा विषय आम्ही विद्यार्थ्यांनी जाऊन बघितला.. आभ्यास केला. तिथे जनजागृती घडवुन आणली. आपणच आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे आपल्याला आॅक्सीजन लाॅग् लाईफ मिळाला पाहिजे, ही जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली. त्यानंतर आश्लेषा अभय उजागरे
ह्या पक्षीमित्र आणि सोलर एनर्जी मध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थीनीने आपले या विषयावरआपले विचार मांडले. ती म्हणाली पशुपक्षी या जिवनसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. त्यांना प्रयत्न पुर्वक वाचवले पाहिजे.
त्यानंतर कु.मानसी शामकांत भावसार ही पत्रकार,लोकशाही लाईव्ह आणि प्रताप clg अमळनेर येथील विद्यार्थिनी म्हणाली, आपले नातवंडे आपल्याला बघायचे असतिल तर आपण पर्यावरण सांभाळावे लागेल. ज्या गोष्टी वापरात आहे त्या बंद आपण करू शकत नाही पण त्याचा वापर नीट करणे आपल्या हातात आहे. या परीसंवादाचे सुत्रसंचलन आय एम आर एम. बी ए चा विद्यार्थी प्रणीलसिंह चौधरी याने केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनापा उपायुक्तांनी विचारलेल्या प्रश्नाला , “ईज्रायलचा ९कोटीचा रोड १५ वर्षे टिकतो आणि भारतात १३ कोटिचा रोड ५च वर्षे टिकतो.” या प्रश्नांला उत्तर देतांना दंडवते यांनी सांगितले “हे प्लॅस्टिकच्या यथायोग्य रिसायकलींग मुळे शक्य आहे. पण त्यासाठी राज्यकर्ते आणि ठेकेदार हि साखळी आणि एकुणच दुरावस्था संपली पाहिजे. त्यांनी उदाहरणादाखल सिंगापूरमधील प्लॅस्टिक चा प्रोसेसिंग प्लॅन्ट जो समुद्रात उभा केला आहे,त्याची माहिती दिली. पण ते शिस्तबद्ध नागरीक आहेत.आपण साधी कापडी पिशवी जवळ बाळगणे गरजेचे आहे,हे सुध्दा अजुन समजुन घेत नाही. त्यानंतर पूनीत शर्मा, ब्रिजेश कुमार /धर्मेंद्र यादव,हिमांशू पंडीत यांनी बदलते हवामान,
इन्डस्ट्रीयल वेस्ट, वृक्षै करती सदा रक्षण, स्वच्छतेच्या मार्गावर, या विषयावर ई पोस्टर प्रेझेंटेशन केले. तसेच बेस्ट ऑफ वेस्ट ची स्पर्धा ही पार पडली याप्रसंगी प्रा शुभदा कुलकर्णी, डॉ शमा सराफ, डॉ अनुपमा चौधरी, डॉ निशांत धुगे, प्रा योगेश पाटील, स्वप्नील काटे आणि आय एम आर रोटरॅक्ट पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. आभार स्वप्नील खडसे, सलोनी पाटील यांनी मानले.