<
जळगाव-(दिपक सपकाळे) (भाग-१) येथील सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाच्या अधिनस्त असलेले 3 तत्कालीन अधिकाऱ्यांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत सविस्तर असे की जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक सपकाळे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या कार्यालयाकडे व समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांच्याकडे त्या तीन अधिकाऱ्यांची माहिती मागितली होती परंतू तब्बल एका वर्षा नंतर समाजकल्याण विभागाने माहीती उपलब्ध करून दिली, व समाजकार्य महाविद्यालयाने तत्काळ माहिती उपलब्ध करुन दिली होती. त्यामध्ये (१)रविंद्र राजाराम सोनवणे (२) सुरेभान रामराव पाटील (३)हेमलता मोहोड या तीन अधिकाऱ्यांनी नोकरीत असताना नियमित शिक्षण घेतले आहे व यांच्या परवानगी विषयक माहिती मागितली होती. या माहितीच्या आधारे संबधितांनी शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.
तसे पाहता कोणत्याही अधिकाऱ्याने नोकरी करत असताना कुठल्याही प्रकारचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास संबंधित कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे परवानगी न घेतल्यास वरिष्ठ कार्यालय कारवाई करू शकते याबाबत सविस्तर वृत्त पुढील भागात सत्यमेव जयते वर वाचा.
Informative
hallo