<
गायन कार्यशाळा, मराठी व्याकरण कार्यशाळा, हिंदी कार्यशाळा, प्रश्नपेढी तयार करणे यांचे आयोजन
जळगाव(प्रतिनिधी)- प.न.लुंकड कन्या शाळेत शनिवार दिनांक १ रोजी दप्तर मुक्त शनिवार या अंतर्गत विविध कार्यशाळा घेण्यात आल्या, त्यात सर्व प्रथम इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनींसाठी गायन या विषयाअंतर्गत निसर्ग गीत घेवून कार्यशाळा घेण्यात आली. इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थीनींसाठी मराठी व्याकरण व हिंदी व्याकरण कार्यशाळा घेण्यात आल्या. मधल्या सुट्टीनंतर इ.५ वी ते ८ वी व्दितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांची प्रश्नपेढी विद्यार्थीनींकडून तयार करून घेण्यात आली. गायन कार्यशाळा रागिणी पुराणीक यांनी घेतली, तर मराठी व्याकरण कार्यशाळा मेघना पिंगळे यांनी घेतली, हिंदी व्याकरण कार्यशाळा प्रवीण धनगर यांनी घेतली. संगणक विभागातील श्यामल ढेपे व दिनेश वैद्य यांचे विशेष सहकार्य लाभले. दप्तरमुक्त शनिवार कार्यक्रमांचे नियोजन शाळेच्या पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. सदर उपक्रमाचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुशीलदादा अत्रे, शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस अभिजीत देशपांडे, सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य शरदचंद्र छापेकर, शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. सदर उपक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. सदर कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.