<
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगावा- मनोज भालेराव
जळगाव (प्रतिनिधि):- विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानीक दृष्टिकोण रुजावा या हेतुने प्रगती विद्यामंदिर शाळेतील विज्ञान शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यानाचा कृतियुक्त सहभाग घेऊन न्यूटन डिस्क म्हणजेच न्यूटन तबकडी बनवली.ही डिस्क सर आयझाक न्यूटन यांनी बनवली होती यात त्यांनी त्या डिस्कचे सात समान भाग करून तिची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या रंगानी रंगविली ती तबकड़ी स्टॅंड वर बसविली व जोरात फिरवली.त्या वेळी सात रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला यावरून सूर्यप्रकाश सात रंगांचा बनला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यास न्यूटन डिस्क किंवा न्यूटन तबकड़ी असे म्हणतात.हा प्रयोग विद्यार्थ्यांना कृतितुन व त्यांच्या अनुभवातून समाजवा हा उद्देश्य सफल झाला.अशा कृतितुनही विज्ञान शिकता येते या गोष्टीचा आनंद, कुतूहल आणि आश्चर्य विद्यार्थ्यांच्या तोंडावर दिसून येत होते. या उपक्रमाचे कौतूक संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल अध्यक्षा मंगलताई दुनाखे यांनी केले.