<
जळगाव – मेरा ये देश सोने की चिरैया नाम भारत हैं, चंदन है यहां माटी, यहां नदिया भी पावन है। डॉ.प्रियंका सोनी ’प्रीत’ रचित या काव्य पंक्तींनी बहुभाषिक काव्य मैफिलीला सुरुवात झाली.
देशभक्त, वसंतोत्सव, राष्ट्रीय कवी सूर्यकांत त्रिपाठी यांच्या जयंतीचे औचित्य साधत जयनगरमध्ये या काव्य मैफिलचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य मैफिलीत जळगावातील कवी कवयित्रींनी आपापल्या कवितांच्या माध्यमातून देश आणि समाजाला सदृढ बनविणार्या विचारांना आणि वसंत ऋतूच्या येण्याने निसर्गाचे बदलत असलेले सुंदर स्वरूप सर्वांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यकार रमेश लाहोटी तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शायर जनाब अजीज व्यावली होते.
मैफिलीत कवी उषा शर्मा, आजमी अहमद मेहंदी, कनीज मेहंदी, पुष्पलता कोळी, मिना बियाणी, रागेश्वरी पारेख, पुरुषोत्तम पारधे, प्रवीण लोहार, निवृत्तीनाथ कोळी, मुस्ताक साहिल, यास्मिन मेहंदी, शीतल पाटील, मंजुषा पाठक यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन डॉ.प्रियंका सोनी यांनी तर आभार संस्थेचे सचिव उमेश सोनी यांनी मानले.