<
जळगाव-(प्रतिनिधी)-येथील एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे देणारे मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय शेखावत , स्वागगत समिती सदस्य यामिनी कुलकर्णी, नगरमंत्री आदेश पाटील, प्रा. अर्चना भावसार, कबचौनगर अभियान संयोजिका श्रुष्टी अहिरराव कार्यक्रम प्रमुख क्रांती पाटील, प्रशिक्षक श्री प्रवीण राव सर उपस्थित होते.
यावेळी प्रा. संजय शेखावत सरांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्व संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत जेणेकरून स्वतःचा बचाव त्या स्वतः करू शकतील असे प्रतिपादन देखील प्रा.संजय शेखावत यांनी केले. यावेळी त्यांनी अभाविपचे अभिनंदन देखील केले की मिशन साहसी अभियान राबवून ते विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही चांगली बाब आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यामिनी कुलकर्णी देखील उपस्थित होत्या. त्यांनी स्व संरक्षणाचे महत्व उपस्थित विद्यार्थिनींना विषद केले. तसेच स्व संरक्षित होण्यासाठी सदैव उत्साहित व आत्मविश्वास बाळगून राहणे खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचे महत्व उपस्थितांना सांगितले. आदेश पाटील यांनी अभाविप परिचय करून दिला. तसेच मिशन साहसी अभियान काय आहे?, त्याचा उद्देश सृष्टी अहिरराव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना सांगितला. सायली पाटील यांनी सुटसंचालन केले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हा संयोजक मनोज पाटील, मिशन साहसी महानगर संयोजिका रिद्धी वाडीकर, चेतन भैरव, तुषार पाटील, संजीवनी सवई, आदिनाथ सूर्यवंशी, ऐश्वर्या पाटील, शुभांगिनी पाटील, वैष्णीवी नेरकर, साक्षी पाटील, श्रद्धा सोनार, सारिका शेळके, तृप्ती सूर्यवंशी, हृचिता राजूरकर, अर्पिता देसले, हेमांगी सराटे, हर्षदा दिगराळे, सेजल गुजर, कृनिका जाधव, अनुप पाटील, संकेत सोनवणे, हर्षल देवरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.