<
जळगाव-(जिमाका) -महाराट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनू सारयान हे 13 ते 15 फेब्रुवारी, 2020 दरम्यान जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.
गुरूवार, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.00 वाजता नाशिक येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता महानगर पालिकेचे आयुक्त यांच्यासमवेत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत महापालिका कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता वार्ताहर परिषद. दुपारी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत सफाई कामगारांच्या समस्यासंबंधी आढावा बैठक. सायंकाळी 5.00 वाजता वार्ताहर परिषद. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दिनांक 15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता भुसावळ येथून शासकीय वाहनाने पाचोराकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेसमवेत सफाई कामगारांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.30 ते 1.30 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 1.30 वाजता पाचोरा येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कामगांच्या समस्यांबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.00 वाजता वार्ताहर परिषद. सायंकाळी 6.00 वाजता चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने नाशिकडे प्रयाण रात्री 9.30 वाजता नाशिक येथे आगमन व मुक्काम.