<
जळगाव-(जिमाका) – जळगाव शहरातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांचे एकदिवसीय शिशुपोषण विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. प्रास्ताविकात बाल बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) जळगाव विजयसिंग परदेशी यांनी बाळाच्या वाढीसाठी पहिले एक हजार दिवस बाळासाठी किती महत्वाचे आहेत हे विषद करून सांगितले. तसेच त्यासाठी अंगणवाडी सेविका यांची शिशुपोषणातील भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले.
युनिसेफ राज्य सल्लागार शिशुपोषण पी. डी. सुदामे यांनी मार्गदर्शन करताना गरोदर मातेने किमान 4 वेळेस आहार घेतला पाहिजे. आहारात सर्व प्रकारचे अन्नघटक असावेत. व कुटूंबातुन मातेला मदत व सहकार्य मिळणे आवश्यक आहे. तसेच जन्मानंतर एका तासाचे आत आईचे दुध व पहिले 6 महिने फक्त आईचेच दुध, बाळ सहा महिन्याचे पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनविलेला पुरेसा मऊसर आहार व सोबतच आईचे दुध कमीत कमी दोन वर्षे पाजावे. बाळाला स्तनपान करताना व आहार भरवतांना बाळाशी संवाद साधणे आवश्यक असल्याच्या सूचनाही श्री. सुदामे यांनी दिल्यात.