<
जळगाव-कोणत्याही भाषेचे वाङमय हे लिपिबद्ध संग्रह असतो. म्हणजे लिपी हा त्या भाषेचा प्राणच आहे. लेखन कलेच्या विकासाने भाषा समृद्ध होत असते. मराठी भाषेच्या व्यावहारिक लेखनाकरिता मध्ययुगात वापरात असलेली मोडीलिपी अलीकडे कालबाह्य ठरले आहे .मात्र न्यायालयीन, आर्थिक व्यवहारांमध्ये व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची शास्त्रशुद्ध मांडणी करण्याकरिता मोडी लिपीचे ज्ञान आवश्यक आहे म्हणूनच कालबाह्य होऊ पाहत असलेल्या मोडी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन विनामूल्य करण्यात आलेले आहे.
मू. जे महाविद्यालयात दिनांक 13 फेब्रुवारी पासून पाच दिवशीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील इतिहासप्रेमी व्यक्ती कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहेत. या मोडी लिपी वर्गात सामाजिक शास्त्र शाळेचे संचालक प्रा. डॉ.देवेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली. डॉ. उज्वला भिरूड यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मोडी लिपी बद्दल मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी इतिहास प्रेमींना व विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे.