<
जळगाव-के.सी.ई.सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे विद्यालय परिसरात दिनांक ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
शिबीरात दररोज व्यायाम, योगासने, प्रार्थना, विचारकर्णिका, स्वयंसिद्धा प्रशिक्षण, ग्रामसफाई, प्लास्टिक मुक्त, तंबाखू मुक्ती अभियान हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच बेटी बचाव व पढाओ, स्वच्छता व व्यसन मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आणि मोहाडी गावातील शाळा बाह्यमुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साहेबराव भुकन (माजी अधिष्ठाता कबचौ उमवि) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना लोखंडे जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.संदीप केदार, प्रा. निलेश जोशी, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी व प्रा.प्रविण कोल्हे हे उपस्थित होते.
या शिबीरास प्रा. केतन चौधरी, प्रा. दुष्यंत भाटेवाल प्रा. मनीष वनकर, प्रा, किसन पावरा, प्रा. गणेश पाटील, प्रा. पंकज पाटील प्रा.केतकी सोनार श्री.मोहन चौधरी, श्री. निलेश नाईक, श्री संजय जुमनाखे, श्री. विनोद चौधरी, श्री. विजय चव्हाण, प्रा. अभय सोनवणे. प्रा. प्रशांत सोनवणे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.