<
जळगाव – मू. जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील पदवी विभागाचा गौरव संतराज आराध्य याने “ स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे आणि शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “राज्यस्तरीय शोध निबंधस्पर्धा” चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती येथे बुधवार दि. १२ फेब्रुवरी २०२० रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यातील ५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतBuddha’s Philosophy Reflected In Sanskrit Drama” या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण करून पदवीविभागातून द्वितीय क्रमांकाचे रुपये ७००/- आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक मिळाले. आणि पदव्युत्तर विभागातून कु. जान्हवी गोविंद देऊळगावकर हिने “मृच्छाकटिकातील हास्यरसाची अभिव्यक्ती” या विषावर शोधनिबंधाचे सादरीकरण करून पदव्युत्तर विभागातून प्रथम क्रमांकाचे रुपये १,०००/- स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक पटकाविले. या शोधनिबंध स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील पदवीच्या ४ आणि पदव्युत्तर विभागाच्या २ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांना संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. भाग्यश्री सु. भलवतकर, प्रा. डॉ. अखिलेश अ.शर्मा प्रा. प्रीती कु. शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय भारंबे, भाषा प्रशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी अभिनंद केले आहे.