<
देवळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलन रंगले : विदयार्थ्यांनी केले विविध गीते नृत्य सादरीकरण
देवळी ता.चाळीसगाव – (प्रतिनीधी) – शहरी भागात सुरू असलेले इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा कल ग्रामीण भागात देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्यास पालकांची इच्छा नसते. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील आता सकारात्मक बदल घडत आहे . देवळी जीप शाळेतील आज आयोजित सुंदर स्नेहसंमेलन हे एक उत्तम उदाहरण आहे. इंग्रजी शाळांमधून दिला जाणारा संस्काराच्या तुलनेत आजही मराठी जी.प.शाळामधील शिक्षण अधिक सरस आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूल्य आणि संस्कारासह विविध गुणात्मक बदल हा कौतुकास्पद असून हे विद्यार्थी उद्याचे उज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज जी.प. प्राथमिक शाळा च्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संपदाताई पाटील बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, जेष्ठ नेते भैय्यासाहेब काका पाटील,सरपंच सुनीता अंकुश निकम, उप सरपंच अतुल पाटील, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ बागुल,चाळीसगाव पालिकेच्या नगरसेविका गुड्डीताई (सविता) राजपूत,माजी पंचायत समितीचे सदस्य बाजीराव नाना दौड, गस माजी संचालक राजुभाऊ पवार,डॉ. अरविंद पारख, वाल्मिक जाधव, मनोज सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी जि. एस. महाजन, उंबरखेडकेंद्र प्रमुख सुनील पगारे,टाकळी प्र दे केंद्र प्रमुख दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक विश्वासराव सूर्यवंशी यांनी प्रास्तविकातून स्नेहसंमेलन घेण्यामागचा उद्देश सांगितला. उमंग परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील पुढे म्हणाल्या ग्रामीण भागात जागरूक पालक,तळमळीने शिकविणारे शिक्षक असले की अनेक जी. प. शाळांमधून गुणवान विदयार्थी घडतात. जसे बालपणात आईची कूस पहिले संस्कार विद्यापीठ असले तरी त्यांनतर शिक्षणा सोबत संस्कारांची जबाबदारी शाळेची असल्याने जीप शाळांनी येणाऱ्या स्पर्धेसोबत गुणात्मक बदल करावेत यासाठी भविष्यात जी मदत लागेल त्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गुलाबराव पाटील यांनी खुमासदार शैलीत सूत्र संचालन केले. यावेळी शाळेचे विदयार्थी,पालक, माता, भगिनी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.