<
जळगाव(धर्मेश पालवे)-जळगांव जिल्हा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चे चा विषय म्हणून वृत्तपत्रात येत असतो. एवढंच काय निवडणुकीच्या दिवसात तर या जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळीच ओळख बनलेली असते.काहींच्या मते येथून राजकारणाचे सूत्रे हलवणारी यंत्रणा वास करीत असते.जळगावातील विकासात्मक धोरणात शहर वासीयांना सुखद धक्का म्हणून शहरातील उद्यान हे सुशोभित करणाचे, व्यवस्थापनाचे, आणि नवीन उद्यान बनवण्याचे काम जिल्हा आयुक्तांच्या आदेशाने शासनाच्या प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक विकास निधी तुन केले गेले. त्यात नगरपालिका च्या अखत्यारीत असणारे बगीचे, उद्याने,आणि रस्त्यावरील बसण्या उठन्याच्या ठिकाणी नूतनीकरण, विरंगुळा,मन निसारण,आणि लहानग्यांना उपयोगशीर असे सनसधान बसवून शहराची वेगळी ओळख निर्माण करणे अपेक्षित होते.यात मुख्यत्वे शहरातील मध्य भागात असलेलं स्वर्गीय बहिणाबाई उद्यान यांच्या ही नावाने सुरू असणाऱ्या प्रभात चौक, रिंग रोड वरील उद्यानाच्या सुशोभी करणा साठी बाल उद्यान सुशोभीकरण,नवं निर्माण,हास्य क्लब बनवणे,आणि नागरिकांना बसण्या उठणाच्या सुविधा पुरवणं या साठी मा आमदार सुरेश दामू भोळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सण 2017 -18 च्या निधीतून काम करण्यात आले आहे. त्यात हायमास्ट लाईट चे खाम्ब, बसाव्याच्या बाकडे, झाड रोपण आणि इतर कामावर तो खर्च करणे अपेक्षित होते. मात्र आज1वर्षात च या उद्यानात बाल उद्यान ची अवस्था पाहावल्या जात नाही, मुलांना खेळण्याची जागा आता गटार आणि गाऱ्याने, खड्याने भरून गेली आहे।लोकांना बसण्याच्या बाकडावर घाण साचलेली असते तर उद्यानातील घाण तेथेच1कोपर्यात साचवली जाते ज्यांच्या वासाने उद्यानात बसने त्रासदायक होतं आहे।सदर उद्यानात मुलं आणि मुलीच्या अंगलट पणाही निदर्शनात येत आहे मात्र उद्यान व्यवस्थापकाने यासाठी कडक निरबंध घातलेले दिसत नाही।त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ वेस्ट आणि लायन्स क्लब ऑफ जळगाव च्या माध्यमातून केली गेलेली मदत कार्य म्हणून बाल उद्यानातील मुलाच्या खेळावयाची संसाधने जसे आगगाडी, झुले,घसरगुंडी, आणि इतर घाणीच्या साम्राज्यात अडकलेली आहेत.येथील कर्मचारी कडे विचारणा केली असता कोणीही आम्ही सुचवलेले आणि सांगितलेले ऐकत नाही, याकडे लक्ष दिले जात नाही असं सांगितलं.तर उद्यानातील बाल उद्यानाचा करार संपला म्हणून बाल उद्यानाची अशी अवस्था झाल्याच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.अश्या आणि कैक अडचणीत असणाऱ्या बहिणाबाई उद्यानाकडे स्थानिक नेते, जिल्हा आयुक्त ,आणि उद्यान व्यवस्थापक यांनि मिळालेल्या स्थानिक निधीचा योग्य वावर केला नाही हे सिद्ध होते.