Monday, July 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आर्थिक नियोजनाची सप्तपदी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in लेख, विशेष
Reading Time: 3 mins read
आर्थिक नियोजनाची सप्तपदी

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी आलेल्या एका विशेष बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ती बातमी म्हणजे डॉ. माधुरी कानिटकर यांची “लेफ्टनंट जनरल” या पदावर नियुक्ती झाल्याची बातमी. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय व पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत.

राजकारण असो वा समाजकारण, स्वतंत्र व्यवसाय असो किंवा नोकरीमधील अधिकारपद, महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अगदी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्येही महिला यशस्वीपणे काम करत आहेत. आपलं घर, कुटूंब आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम महिला “अर्थसाक्षर” आहेत का?

संशोधन एजन्सी डीएसपी विनवेस्टर पल्स आणि निल्सेन यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ मध्ये दिल्ली, मुंबई, कलकत्ता व बँगलोर या महानगरांमधील, तर इंदोर, कोची, लुधियाना व गुवाहाटी या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये काही महत्वाची आकडेवारी समोर आली आहे.

गृलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष ( भाग १ )

सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार–

• ६४% पुरुषांच्या तुलनेत केवळ ३३% महिला आर्थिक निर्णय घेतात. याचाच अर्थ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणाऱ्या महिला आर्थिक निर्णय घेण्यात मात्र फारशी रुची दाखवत नाहीत.

• यामध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या महिलांचे प्रमाण ३०% असून, पतीचे व पालकांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे आर्थिक निर्णय घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे ३३% व २४% आहे, तर वैधव्य (७%), घटस्फोट (६%), अशा कारणांनी आर्थिक निर्णय घेण्याची वेळ आल्यामुळे महिला आर्थिक निर्णय घेतात.

• या सर्वेक्षणानुसार कार, घर अशा मोठ्या खरेदीचे निर्णय पुरुष घेतात तर, सोने / दागिने, घरगुती खरेदी आणि टिकाऊ वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेताना महिलांचे जवळपास १००% योगदान असते.

• याच सर्वेक्षणातून अजून एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे मार्केट बेस म्हणजे बाजारावर अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्यातही पुरुष आघाडीवर असून ३१% पुरुषांच्या तुलनेत केवळ १२% महिला यासंदर्भात स्वतंत्र निर्णय घेतात.

• महिलांच्या गुंतवणुकीच्या ३ मुख्य उद्दिष्टांपैकी २ उद्दिष्ट्ये मुलांशी निगडित असतात.

नियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात. फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा.

गृलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष ( भाग २ )

लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला, आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.

१. पहिले पाऊल : कुटुंबातील आर्थिक नियोजनात सहभागी व्हा.

• तुम्ही गृहिणी असा अथवा स्वतंत्र व्यावसायिक किंवा नोकरदार तुमच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना त्यामध्ये तुमचाही सहभाग असणे आवश्यक आहे.

• बहुतांश वेळा अविवाहित मुली आपल्या कुटूंबातील आर्थिक नियोजनामध्ये भाग घेत नाहीत किंवा त्यांना त्यामध्ये सामावून घेतलं जात नाही. अशावेळी आपली कौटुंबिक परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार आर्थिक नियोजन करा.

• ज्याप्रमाणे एक स्त्री साक्षर झाल्यावर संपूर्ण घर साक्षर होते त्याचप्रमाणे एक “अर्थसाक्षर” स्त्री संपूर्ण कुटुंबाला अर्थसाक्षर बनविते.

निष्कर्ष : लहान मुले निरीक्षणातून शिकत असतात. तुमचा कुटुंबातील आर्थिक नियोजनातील सहभाग बघून मुलांवरही तेच संस्कार होतील व पुढच्या पिढीमध्ये स्त्री व पुरुष दोघेही आर्थिक नियोजनामध्ये समसमान वाटा उचलतील.

२. दुसरे पाऊल : तुमची स्वतंत्र आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा.

• कुटुंबाचा अर्थसंकल्प तयार करताना सामूहिक आर्थिक उद्दिष्टांबरोबर वैयक्तिक आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा. यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतंत्र आर्थिक जबाबदारीची जाणीव होईल.

• तुमच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये तुमच्या वैयक्तिक स्वप्नांचा समावेश करा.

• तुमचं कुटूंब तुमच्यासाठी सर्वस्व असेल, त्यांच्याप्रती तुमची जी काही कर्तव्ये आहेत ती पूर्ण करताना आपली स्वतःप्रती असणारी कर्तव्ये विसरू नका.

निष्कर्ष : कुटुंबातील इतरांची स्वप्ने पूर्ण करताना आपली स्वप्ने विसरू नका.

३. तिसरे पाऊल : बचतीचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये करा.

• बचतीचा किंवा काटकसरी स्वभाव ही भारतीय स्त्री ला मिळालेली सांस्कृतिक देणगी आहे. लहानपणापासून आपली आई, आजी, काकू, मावशी यांना घरखर्चासाठी मिळालेल्या पैशातून बचत करताना अनेकजणींनी बघितलेलं असतं. त्यामुळे ही सवय नकळतपणे लहानपणीच मुलींच्या मनात रुजते.

• आपल्या मागच्या पिढीमध्ये फारच कमी स्त्रियांना गुंतवणुकीचे ज्ञान होते. ज्यांना हे ज्ञान होते त्यामधील बहुतांश स्त्रियांनी सोने, चांदी, दागिने, आरडी, एफ डी फारफार तर, रिअल इस्टेट अशा पारंपरिक पर्यायांनाच पसंती दिली होती.

निष्कर्ष : बचत केलेल्या बचतीचे योग्य गुंतवणुकीत रूपांतर करून आपल्या बचतीचे मूल्य वाढवा.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

४. चौथे पाऊल : गुंतवणूक नियोजन.

• एकाच पर्यायामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीमध्ये गुंतवणूक करा.

• म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉण्ड्स, ईटीएफ गोल्ड अशा गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांची माहिती घ्या.

• गुंतवणूक करताना तुम्हाला आधुनिक पर्याय जास्त जोखमीचे वाटत असतील तर,एसआयपी सारख्या आधुनिक परंतु तुलनेने सुरक्षित पर्यायापासून सुरुवात करा.

निष्कर्ष : पारंपरिक व आधुनिक गुंतवणुकीचा सुरेख संगम साधून तुमचे भविष्य सुरक्षित करा.

५. पाचवे पाऊल : आपत्कालीन निधीची तरतूद

• आपल्याकडे चांगला संरक्षण पोर्टफोलिओ नसल्यास आपल्या सर्व गुंतवणूकीच्या योजना असफल होऊ शकतात.

• आपत्कालीन परिस्थितीला तोंड देताना पुरुषांपेक्षा जास्त धैर्य स्त्रियाच दाखवतात. आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपत्कालीन निधीची तरतूद करा.

• किमान तीन महिन्यांच्या घरगुती खर्चाची चिंता मिटेल इतपत निधीची तरतूद तुमच्या बचत/ गुंतवणुकीमध्ये असणं आवश्यक आहे.

• अविवाहित असाल तर, मुदत विमा अवश्य घ्या.

निष्कर्ष : वेळ सांगून येत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची आर्थिक तयारी ठेवा.

‘ आकस्मिक निधी ‘ हाताशी हवाच !

६. सहावे पाऊल : आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

• महिला कुटुंबातील सर्वांची काळजी घेतात पण त्यांना स्वतःकडे बघायला मात्र अजिबात वेळ नसतो.

• आपलं आर्थिक नियोजन करताना त्यामध्ये आरोग्य खर्चाचाही विचार करा. कारण अचानक उद्भवणारा आरोग्य खर्च संपूर्ण घराचे आर्थिक नियोजन बिघडवून टाकतो.

• कुटुंबाचा आरोग्य विमा काढताना आपल्या गरजांनुसार योग्य पॉलिसी निवडणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणता आरोग्य विमा घ्यायचा याबाबत आपल्या कुटुंबियांशी चर्चा करा. आरोग्य विमा नूतनीकरण करण्याच्या तारखाही लक्षात ठेवा.

• सतत शिळे अन्न खाणे किंवा संपवायचे म्हणून नको असताना खाणे टाळा. सकस ताजे अन्न सेवन करा. रोजचा किमान अर्धा तास व्यायामासाठी राखून ठेवा. आपले छंद जोपासा आणि आनंदी राहा

निष्कर्ष : आरोग्यम धनसंपदा ! आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्याच हातात असते.

७. सातवे पाऊल : आपले आर्थिक हक्क व कर्तव्य समजून घ्या.

• हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. आर्थिक हक्क व कर्तव्ये समजून घेणे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या स्वतःच्या बचत, गुंतवणूकीचा उपयोग स्वतःसाठी अथवा कुटुंबासाठी करणे.

• आपले आर्थिक हक्क व कर्तव्य म्हणजे आपल्या आसपासची “इकोसिस्टम” समजून घेणे. आपल्या जोडीदाराची मालमत्ता, दोघांची संयुक्त खाती याबद्दल तुम्हला माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या बचत व गुंतवणुकीची जोडीदाराला माहिती द्या.

• अविवाहित असाल तर, कुटुंबाप्रती आपली आर्थिक जबाबदारी, कुटुंबातील मालमत्तेमध्ये तुम्हाला मिळणारे हक्क, यासंदर्भात माहिती घ्या. एक लक्षात घ्या, माहिती घेण्याचा अर्थ हक्क गाजवणे नव्हे.

• आयुष्य सोपं नाही. वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या अथवा कौटुंबिक हिंसेसारख्या प्रसंगांमुळे घटस्फोट घ्यायची वेळ आली, तर घाबरून मागे येऊ नका. यासंदर्भात कायद्याने मिळणाऱ्या हक्कांची माहिती घ्या.

निष्कर्ष : आपल्या आसपासच्या आर्थिक घडामोडींची माहिती घ्या. तसेच, आपल्या आर्थिक हक्क व कर्तव्यांची जाणीव ठेवा.

°°°°°°°°°°°°°°°° संकलन °°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर.
सी.सी.डी.सी.अपार्टमेंट पहिला मजला,प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी हाँटेल पांचाली जवळ प्रभात चौक,जळगाव ४२५००१
arunchavan2510@gmail.com

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांचा पुण्यात इंडियन पॉवर वूमन पुरस्काराने गौरव

Next Post

8 मार्च जागतिक महिला दिन-अरुण वांद्रे(शिक्षक)

Next Post

8 मार्च जागतिक महिला दिन-अरुण वांद्रे(शिक्षक)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications