<
जळगाव दि.16प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले आहेत. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत निवेदन संस्थेने दिले आहे.
एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर याठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते. कोरोना व्हायरसाचा प्रसार होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासनाचा आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी उद्या. दि.17 ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे असे अध्यक्ष अशोक जैन यांनी कळविले आहे.