<
गालापुर जि.प.प्राथमिक शाळेत कोरोना विरोधात पालक विद्यार्थी जनजागृती संवाद
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे वातावरण तयार झाले आहे ते पाहता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी दररोज सकस आहार व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास त्याच जोडीने विद्यार्थी पालक व सर्व घटकांनी स्वच्छतेचे नियम पाळल्यास बोलताना एक मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवले, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कधीच न थुंकणे, पूर्ण शिजवलेले अन्न फळभाज्या खाणे, यासह शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले, सार्वजनिक समारंभ आदी ठिकाणी स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून व जबाबदार नागरिक म्हणून खबरदारीचे उपाय पाळण्याचे आवाहन गालापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्वेच्छेने शाळेत आयोजित केलेल्या कोरोना जनजागृती शाळास्तर विद्यार्थी-पालक संवाद कार्यक्रमात बोलताना केले. सर्व विद्यार्थ्यांना जीवनात सातत्यपूर्ण स्वच्छतेचे आणि आरोग्याचे नियम पाळण्याचे महत्त्व किती आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने पटवून दिले.सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, घशामध्ये तीव्रतेने दुखणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या मान्यताप्राप्त डॉक्टरांची संपर्क साधावा उपचार करून घ्यावा असेही यानिमित्ताने त्यांनी म्हटले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आपल्या स्वतःपासून आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केले.