<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती समन्वयक दिव्या यशवंत यांनी आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन गावातील २० वर्षं रखडलेल्या “सुतार बर्डी” धोरणासंदर्भात निवेदन दिले. आणि ह्या धरणाचे काम तात्काळ सुरू करुन ते ह्याच वर्षी पुर्ण करण्याचा हमीचा शब्द मंत्रीमहोदयां कडून घेत, साकडं घातलं. तसेच गावातील आंतरिक राजकारणामुळे सामान्य शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व रखडलेले धरणाचे काम या बद्दल सविस्तर चर्चा केली. आमडदे गावासोबतच इतर गावांसाठी “सुतार बर्डी” धरणाचे महत्व मंत्री महोदयांना पटवून दिले. या शेतकरी कन्येच्या निवेदनाची मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, जळगांव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी स्वतः पत्र व्यवहार करून धरणाचे काम पूर्ण करण्याची हमी दिली.