जिल्ह्यातील ईग्लींश स्कुलची माहीती देण्यास शिक्षण विभागाकडून टाळाटाळ-माहीती आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

बीड-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ईग्लींश स्कुलची माहीती अधिकार अर्जात मागितल्यानतंर एक वर्षानतंर ही शिक्षण विभागाकडून माहीती देण्यास टाळाटाळ केली जात आहे राज्य माहीती आयुक्त खंडपिठ औरगाबाद यांनी दि,22/01/2020 रोजी अपीलार्थी निलेश चाळक यांना पंधरा दिवसात परिपुर्ण देण्याचे आदेश जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्रा याना माहीती देण्याचे आदेश दिले होते पंरतू शिक्षण विभागाने राज्य माहीती आयुक्त खंडपिठ औरगाबाद यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अपीलार्थी निलेश चाळक यांना माहीती दिली नाही.

याबाबत अधिक माहीती अशी कि,दि,03/02/2019 रोजी निलेश चाळक यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्याकडे आँनलाईन माहीती अधिकार अर्ज दाखल करून बीड जिल्ह्यातील केजी 1.केजी 2 वर्गाच्या ईग्रंजी शाळाविषयी माहीती मागितली होती जनमाहीती अधिकारी यांनी मुदतीत कोणतीही माहीती दिली नाही पञव्यवहार केला नाही आणि राज्य माहीती आयुक्त खंडपिठ औरगाबाद यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांनी माहीती नाही दिल्याने आपण कलम 18 प्रमाणे तक्रार दाखल करणार आहोत असे अपीलार्थी निलेश चाळक यांनी सागितले.

राज्य माहीती आयुक्तांनी मागितला खुलासा

जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हापरिषद बीड यांनी माहीती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7(1) चा भंग केला आहे त्यामुळे त्यांच्या विरूध्द माहीती अधिकार अधिनयम 2005 मधील कलम 20 मधील तरतुदीनुसार कारवाई का ? करण्यात येऊ नये यांचा जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 30 दिवसाच्या आत करावा व मुदतीत आपला खुलासा प्राप्त नाही झाल्यास आयोग एकतर्फी निर्णय घेईल असे आदेशात राज्यमाहीती आयुक्त यांनी नमुद केले आहे

माहीती अधिकार अधिनियम मधील कलम 19(6) चा भंग

प्रथम अपिलीय अधिकारी यांना अपीलार्थीचे प्रथम अपील मिळाल्याच्या दिनांकापासून यथस्तिति तीस दिवसाच्या आत किंवा ते दाखल केल्याच्या दिनाकांपासून एकून 45 दिवसापेक्षा अधिक कालवधी होणार नाही अशा वाढवलेल्या कालवधीच्या आत कारणे लेखी नमुद निकालात काढावे अशी अधिनियमातील कलम 19(6) मध्ये तरतुद विहीत केलेली आहे प्रथम अपीलिय अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड,यांनी विहीत मुदतीत प्रथम अपीलावर अपेक्षित कारवाई केली नसल्यामुळे अधिनियमातील कलम 19 (6) चा भंग झालेला आहे त्यामुळे त्यांच्याविरूध्द मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाच्या परिपञक क्रं केंमाअर्ज -2007 /74/प्र.क्र.154/07/06/ दि,31/03/2008 कारवाई अनुसरावी व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड अधिनियमातील कलम 7(1)व कलम 19(6) किंवा अन्य कलमाच्या भंगास जबाबदार व्यक्तीची नावे निश्चित करून त्यांना हा आदेश बजावावा व त्यांची पोहच जतन करून,ठेवावी असे ही आदेशात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here