<
मुंबई (प्रतिनीधी)- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा परिणाम कमी होतांना दिसत नाही , सगळ्यात जास्त प्रभाव हा महाराष्ट्रात मुंबई,पुणे व इतर महानगर क्षेत्रात झालेला पहायला मिळालेला आहे,अश्या अवस्थेमध्ये आपलयाला विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा घेता येणे शक्य नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी हे परीक्षार्थी असणार आहेत जो पर्यंत सध्याची परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही परीक्षा घेऊ नये किंवा आम्ही काही पर्याय मान राज्यपाल, मान. मुख्यमंत्री, मान. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, मान. वैद्यकीय शिक्षण मंत्री व तसेच सार्वजनिक विद्यापीठाचे कुलंगरू यांस ई-मेलद्वारे निवेदनातून मांडले आहेत व आमचे हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कारवाहीस पुढे पाठवलेले आहे. आम्ही आपले लक्ष या बाबीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत की चीनच्या वुहानमध्ये परिस्थिती नियंत्रणात यायला जवळपास ४ महिन्याचा कालावधी लागला व माहे एप्रिलमध्ये परिस्थिती आटोक्यात आली त्यानुषंगाने जर आपण विचार केला , तर आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जून पर्यंत वाट पाहावी लागेल किंबहुना आपण तसे प्रयत्न देखील सुरु केलेले असावेत , तोपर्यंत आपण विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करणे उचित होणार नाही , जरी आपण लॉकडाऊन उघडले तरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी धोका पत्करणे हे जोखमीचे ठरेल , म्हणून पुढील काही महिने सामाजिक अंतराचे (social distancing) अतिशय काटेकोरपणे पालन करणे अतिआवश्यक आहे. असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पर्याय १.- पदवीधर वार्षिक परीक्षा पॅटर्न – ज्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या त्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात याव्यात व त्यांचे निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घोषित करावे जेणेकरून ते राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर परीक्षेसाठी पात्र ठरतील.- पदवीधर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – एप्रिल, मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा या सर्व परीक्षा हिवाळी सत्राच्या परीक्षेसोबत एकत्र घेण्यात याव्यात आणि ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्या विषयात सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत.- पदव्युत्तर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा या सर्व परीक्षा हिवाळी सत्राच्या परीक्षेसोबत एकत्र घेण्यात याव्यात आणि ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्या विषयात सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत.
पर्याय २.- पदवीधर वार्षिक परीक्षा पॅटर्न – विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या २ वर्षाच्या गुणवत्तेची सरासरी काढून त्या आधारावर शेवटच्या वर्षाची परीक्षा न घेता त्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील.
– पदवीधर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टरपॅटर्न – एप्रिल, मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा न घेता अगोदरच्या सेमिस्टरच्या आधारावर सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतील. ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावी. (उदाहरण – सेमिस्टर १,३ आणि ५ गुणांच्या आधारावर सेमिस्टर २, ४ आणि ६च्या परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत.)
– पदव्युत्तर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा न घेता अगोदरच्या सेमिस्टरच्या आधारावर सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पीएचडी अभ्यासक्रम आणि पीएचडी प्रवेश परीक्षा प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावी.
(उदाहरण – सेमिस्टर १ आणि ३ गुणांच्या आधारावर सेमिस्टर २, आणि ४ च्या परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत)