<
विरोदा(किरण पाटील)- येथील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पाचशे रुपये फैजपुर च्या युनियन बँकेत जमा होत असल्याने खातेदारांना घरपोच सेवा देत असून ही योजना आधीपासून सुरू आहे परंतु नुकत्याच कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही योजना जोमाने काम करीत आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लाभ गरीब आणि गरजूंना मिळावा म्हणून ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे तसेच उज्वला गॅस धारकांना त्यांच्या खात्यात ७४४ रुपये जमा होत असून त्यांनासुद्धा ही सेवा घरपोच दिली जात आहे तसेच जनधन खातेदारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाचशे रुपये प्रमाणे जमा होत असल्याने त्यांनासुद्धा लॉक डाऊन सुरू असल्यामुळे बँकेत किंवा बँकेच्या आवारात गर्दी होऊ नये म्हणून ही योजना बँके तर्फे जोराने सुरू आहे ही सेवा घरपोच सुरू असल्यामुळे युनियन बँकेचे सर्व कर्मचारी ही सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅन्डग्लोज, सँनीटायझर तसेच माक्स चा वापर करून फैजपुरच्या युनियन बँकेकडून घरपोच सेवा देत आहे बँकेची ही सेवा खातेदारांना एसटी रिक्षा वगैरे ची सुविधा नसल्यामुळे व्यवस्थापक यांनी घरपोच सेवा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. फैजपूर सह आमोदा, विरोदा, अकलूज, कासवा, दुसखेडा, कठोरा आदी गावांमध्ये जोराने सुरू आहे. तसेच ही सेवा कोरोना च्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउनच्या काळात फैजपूर युनियन बँकेचे कर्मचारी काटेकोरपणे पालन करीत असल्याचे चित्र आहे बँकेचे नियोजन येथील शाखा व्यवस्थापक जे एस टोकरे यांच्यासह युनियन बँकेचे ( बारट्रोनिक्स ) चे बँक मित्र आसिफ तडवी कयूम तडवी जाकिर पिंजारी हे काम पहात आहे.