<
जळगाव : येथील जेसीआय जळगाव शाखेतर्फे शाहू नगर भागातील गरीब व हातमजूर कुटुंबातील नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. या काळात संचारबंदी लागू झाल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. देशात आता दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढल्याने मजुरी करुन पोट भरणार्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. याचाच एक भाग म्हणुन जेसीआय जळगांवने शहरातील शाहु नगर भागात गरीब, गरजु व काही अपंग कुंटुबीयांना नुकतेच किराणा सामानाचे वाटप केले. यात गव्हाचे पीठ, तेल, तुर दाळ, मीठ, मिरची, मसाला, हळद, साबण, अशा जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
जेसीआय एक मोठी आंतरराष्ट्रीय संघटना असुन, वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम संस्था घेत असते. आतापर्यत या लॉकडाऊन काळात जेसीआयने गरीब वस्तीत केळीवाटप तसेच पोलिसांसाठी भर उन्हात लस्सीवाटप केली आहे. गोलाणी मार्केटमध्ये सेनीटायझर वाटप उपक्रम घेतला होता. उपक्रमात जेसीआय जळगांवचे अध्यक्ष शरद मोरे(माळी), सचिव प्रमोद गेहलोत, प्रतिक शेठ यांच्यासह सागर पोळ, सुशिल चौधरी, सुनिल टेकावडे आदींचे सहकार्य लाभत आहे.