Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प. शाळा गालापुर येथे मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनीधी)- मौलाना अबुल कलाम आझाद केवळ भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री नव्हते तर ते सच्चे राष्ट्रभक्त व स्वातंत्र्य सेनानी होते. ते नामवंत शिक्षणतज्ञ, कवी संपादक व शिक्षणाचा पुरस्कार करणारे थोर समाजसेवक भारत रत्न होते असे प्रतिपादन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३१व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षण दिन छोटेखानी उपक्रमांतर्गत बोलताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिनांक 11 रोजी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेश भिल, सुभाष दादा भील, सुनिल आप्पा भील, सखाराम सोनवणे, राकेश माळी, रेखाताई भिल, सीमाताई सोनवणे, काळू पवार, शशिकांत सोनवणे, नरेश बागुल, राजु बारेला, बाप्पू पवार आदीं मान्यवरासह विद्यार्थी पालकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ४नोव्हेंबर २०१९रोजी महाराष्ट्र शासनाचे कक्षाधिकारी आदरणीय नेहा हुमरसकर यांनी एक पत्रक काढून यंदादेखील सालाबादाप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त सर्वत्र शैक्षणिक परिसंवादाचे निर्देश दिलेले आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्‍कर जगन्‍नाथ पाटील यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य आणि सर्व शाळांमध्ये उपक्रम घेण्याची सुचवलेले आहे. एरंडोल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वत्र राष्ट्रीयशिक्षण दिन साजरा होत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाज व्यवस्थेतील सर्व घटकांनी सु समन्वयाने एकत्रित येऊन शिक्षणाचा दिवा अधिक प्रज्वलित करण्यासाठी कार्य करण्याची व संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण  सर्वांग विकासाचे प्रवेशद्वार आहे.म्हणून आज सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची कास धरण्याची शपथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर येथे देण्यात आली. समाजव्यवस्थेत तळागाळात अजूनही शिक्षणाविषयी कार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसह माता पालक समिती शिक्षक-पालक संघ शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमन फाऊंडेशन व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्यावतिने ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

नगरपरीषद प्रशासन व अधिकाऱ्यांकंडुन मनमानी कारभाराची वाटचाल;अधिकाऱ्यांना पडलाय नैतिक व मुलभूत कर्तव्यांचा विसर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo