Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात रिद्धी, सिद्धीच्या डोळ्यांवर यशस्वी लेजर उपचार; रेटिना तज्ञ डॉ.अश्‍विनी पाटील यांनी घेतले परिश्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात रिद्धी, सिद्धीच्या डोळ्यांवर यशस्वी लेजर उपचार; रेटिना तज्ञ डॉ.अश्‍विनी पाटील यांनी घेतले परिश्रम

लेजर उपचारामुळे दृष्टी वाचण्यास मदत- डॉ.अश्‍विनी पाटील, रेटिनातज्ञ

जळगाव(प्रतिनिधी)- अवघ्या दोन महिन्यांची रिद्धी साडेसातमाशी असतांनाच जन्माला आली. वजनही कमीच भरले. अशा या गोड-गोंडस परीची संपूर्ण अवयवांची वाढ झाली नाही त्यात डोळ्यांद्वारे ती आपल्या आईला नीटसे पाहूही शकत नव्हती.

मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध असतात. त्यात रेटिना तज्ञ असलेल्या डॉ.अश्‍विनी पाटील यांच्याकडे चिमुकल्या रिद्धीला दाखविले असता त्यांनी लेजर करावे लागेल असे सांगितले.

लेजर उपचाराने चिमुकली रिद्धीसह तिची बहिण सिद्धीलाही सृष्टी दिसू लागली आणि हे पाहून तिच्या आई-वडिलांचा डोळ्यात आनंदाश्रु तराळले.

जळगावजवळील शिरसोली येथील रहिवासी असलेले दिगंबर लावणे यांच्या पत्नीची प्रसृती २७ जुलै रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वीरित्या झाली. मात्र नऊ महिने नऊ दिवस भरले नाही, अवघ्या साडे सात महिन्यातच प्रसुती होवून दोन कन्यारत्न जन्मास आले. जन्माला आल्यावर दोघींचे वजनही कमी भरले आणि त्यातील रिद्धीला तात्काळ रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर उपचारार्थ ठेवण्यात आले.

एनआयसीयूतील डॉ.सुयोग तन्नीरवार यांच्यासह इंटर्न डॉ.रोहन दोषी, डॉ.प्रज्ञिल यांच्यासह नर्सिंग स्टाफचे सहकार्य आणि दैव बलवत्‍तर असल्याने तब्बल ५७ दिवसांनंतर व्हेंटीलेटरवरील ते बाळ सुखरुप परत आले आणि तिच्या जन्मदात्यांच्या जीवात जीव आला. दरम्यान त्या जुळ्या मुलींचे बारसे झाले आणि रिद्धी-सिद्धी असे त्यांचे नामकरण करण्यात आले, यातील ती रिद्धी… रिद्धीचे वजनही खुप कमी होते आणि डोळ्याच्या पडद्याची वाढ कमी असल्याचे डॉक्टरांना जाणवले आणि त्यांनी रुग्णालयातीलच रेटिना तज्ञांकडे तपासून येण्याचा सल्‍ला दिला.

दरम्यान दिगंबर लावणे हे आपल्या चिमुकल्या रिद्धी आणि सिद्धीला घेऊन रेटिना विभागात आले, याप्रसंगी डॉ.अश्‍विनी पाटील यांनी बाळाला तपासले. दरम्यान बाळाच्या डोळ्यातील पडद्याची स्थिती आणि रक्‍तवाहिन्यांची न झालेली वाढ हे ओळखले. त्याला रेटिनो पॅथो प्रिमॅच्युरीटी असे शास्त्रीय भाषेत संबोधले जाते. याप्रसंगी दोन महिन्यांच्या रिद्धी आणि तिची बहिण सिद्धी या दोघींवर ४ आठवड्यात लेजर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर रिद्धी आणि सिद्धीला योेग्य दृष्टी मिळाली आणि त्या सभोवतालच्यांना न्याहळू लागली, त्याबद्दल रिद्धी आई-वडिल यांनी डॉक्टरांसह रुग्णालयाचे आभार मानले.

लेजर उपचारामुळे दृष्टी वाचण्यास मदत- डॉ.अश्‍विनी पाटील रेटिनातज्ञ प्रि-मॅच्युअर बेबींमध्ये अनेकदा बाळांना दृष्टीदोष निर्माण होतो. यात बाळाचे वजन २ किलो पेक्षा कमी आणि बाळ आठ महिन्याआधी जन्माला आले असेल तर त्या प्रत्येक बाळाची डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात तज्ञांकडून स्क्रिनिंग केली जाते. दोष असल्यास लेजर सारख्या उपचारांनी बाळांची दृष्टी ९० ते ९५ टक्के वाचविली जाते. लेजर उपचारानंतर वेळोवेळी बाळांना फॉलोअपसाठी आणले गेले पाहिजे, यामुळे अन्य कुठलीही समस्या तर उद्भवत नाही ना त्याची माहिती होते. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिराच्या दोन दिवसात दिडशे रुग्णांची नोंद; उद्या समारोप

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरास प्रारंभ एमडी मेडिसीन व एमसीएच तज्ञांकडून तपासणी व शस्त्रक्रिया; पहिल्याची दिवशी ५५ रुग्णांची नोंदणी

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिराच्या दोन दिवसात दिडशे रुग्णांची नोंद; उद्या समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d