Saturday, May 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

जळगाव, दि.17 (जिमाका) : बालविवाह या कुप्रथेवर प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे व मुलाचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह किंवा विवाहासंबंधी कोणत्याही विधीचे आयोजन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती (VCPC) मध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, गावातील डॉक्टर आदींचा समावेश असून त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक विवाहात वयाची पडताळणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात सन 2025 मध्ये चाइल्ड हेल्पलाइन 1098 च्या माध्यमातून 67 बालविवाह रोखण्यात आले. तसेच जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 27 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एका प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बालविवाहाबाबत तक्रार करण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असून, प्राप्त तक्रारी पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतात. तक्रार करताना अल्पवयीन मुलगा-मुलगी व विवाहाचे नियोजन याबाबतची आवश्यक माहिती दिल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येते.

बालविवाह झाल्यास संबंधित नवरदेव, वधूचे पालक तसेच हॉल/मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापक, बँड-डीजे, आचारी, भटजी, मौलवी, फोटोग्राफर, टेन्ट पुरवठादार आदी सेवा पुरवठादारांवरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येते.

अल्पवयात विवाह झाल्यास मुलीची शारीरिक वाढ अपूर्ण राहते तसेच लवकर गर्भधारणा झाल्यामुळे मातामृत्यू, अपंग बालक जन्मास येणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अक्षय तृतीया व इतर शुभ मुहूर्तांच्या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात कुठेही अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह होत असल्यास त्वरित 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात वैधता विशेष मोहिम

Next Post

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

Next Post
क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

क्रिकेट फिव्हर ऑन...जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo