Monday, June 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात वैधता विशेष मोहिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात वैधता विशेष मोहिम

जळगाव, दि.17 (जिमाका) : महामानव भारतरत्न डॉ. बाचासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्ती जळगांव या कार्यालयातर्फे समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ या फालावधीत सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
समता सप्ताहमध्ये वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील २०२५-२६ मधील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशीत सर्व मागासगवीय (अनु. जाती. विजाभज, इमाव व विमाप्र.एस.ई.वी.सी. प्रवर्ग) विदयार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविदयालय निहाय संख्यात्मक माहिती, समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.
समान संधी केंद्रांच्या माध्यमातून अर्ज भरून घेणे, मार्गदर्शन व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे. तसेच सीईटी, नीट, गेट परीक्षा देणारे तसेच डिप्लोमा व डी.फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याशिवाय दि. १७ एप्रिल २०२६ तसेच २० ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत त्रुटी पूर्तता मोहिम राबविण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयामार्फत परिपूर्ण अर्ज सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६;जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

Next Post

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

Next Post
बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo