Saturday, May 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील पथदिवे दिवसा सुरूच, महावितरण विभाग भरदिवसा घेतयं झोपेचं सोंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शहरातील पथदिवे दिवसा सुरूच, महावितरण विभाग भरदिवसा घेतयं झोपेचं सोंग

जळगांव(चेतन निंबोळकर)- शहरातील मेहरूण (तांबापुर) भागात विजेच्या खांबावर प्रखर झोत दिवे बसविण्यात आले आहे. हे दिवे २४ तास आपली सेवा देत असून ते बंद कोणी आणि कसे करायचे याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचे चित्र या भागात दिसत आहे. तांबापूर भागात सलग २४तास दिवे सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. राज्यात विजेसाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. मात्र जळगांव शहर महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील पथदिवे सुरूच आहेत. नगरपालिकेला याकडे पाहण्यास वेळ नसून या विजेचा अपव्यय सुरू असून त्याचे बिल मात्र पालिकेच्या तिजोरीतून भरावे लागत आहे. महावितरण विभागाचे आपल्या कामात लक्ष नसल्यामुळे शहरातील पथदिवे सुरुच राहुन भरदिवसा विजेचा शेकडो युनिटचा अपव्यय सुरू आहे.

याकडे पालिकेचे कर्मचारी लक्ष देत नाहीत. या विजेचा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर बसणार असून पर्यायाने ही रक्कम जनतेच्या खिश्यालाच भुर्दंड ठरणार आहे. पण महावितरण विभाग भरदिवसा झोपेचे सोंग घेत असल्या कारणाने सदर पथदिवे सुरूच राहत आहेत. त्यामुळे अधिक विजेची नासाडी होत आहे. तसेच महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या होणार्‍या नुकसानीकडे गांर्भीयाने पाहत नाहीत. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी याबाबत गंभीर नसल्याकारणाने शहरातील पाणी, दिवाबत्ती, नालीसफाई, रस्ते आदी महत्त्वाच्या प्राथमिक गरजा पुर्णपणे कोलमडुन गेल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. याबाबत कुणाकडे तक्रार करायची या संभ्रमात आहेत. शहरातील विजपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा हया झाडाच्या फादयांनी वेढल्या गेल्यामुळे वाऱ्यानेही शहरातील मुख्य रस्त्यावरील विजपुरवठा अनेकदा खंडीत होत आहे याकडे महावितरण विभाग गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरीकांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महावितरण विभागाला जाग कधी येणार? याकडे लक्ष लागून आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारताच्या समृद्धीसाठी गांधी तत्त्वांचा अंमल करा – डॉ. अनिल काकोडकर

Next Post

फैजपूर च्या धाडी नदीला गेल्या दहा वर्षानंतर प्रथम पूर

Next Post
फैजपूर च्या धाडी नदीला गेल्या दहा वर्षानंतर प्रथम पूर

फैजपूर च्या धाडी नदीला गेल्या दहा वर्षानंतर प्रथम पूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo