Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जि. प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) – सार्वजनिक आरोग्य विभाग व जामनेर पंचायत समीती यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २ रविवारी रोजी जामनेर पंचायत समिती मध्ये आशा दिन साजरा करण्यात आला . तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय, आशा स्वयंसेविका यांनी छान अशा रांगोळी च्या माध्यमा तुन बेटी बचाव बेटी पढाव , हा समाज जागृत्ती पर संदेश देण्यात आला . सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद जळगाव , व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका यांच्या कामाचे कौतुक व्हावे व तळागाळात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्या कामाची दखल घेतली जावी या उद्देशाने आशा दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने व राजमाता जिजाऊ पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती एकनाथ लोखंडे व जि. प.सदस्य अमित देशमुख हे होते. माजी सभापती नीता पाटील, पं. स.सदस्य रमण चौधरी, प्रल्हाद पाटील,नवलसिंग पाटील,पं. स.गटविकास अधिकारी आय.सी.गोयल,
डॉ.मनोज तेली,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.योगेश राजपुत यांची विशेष उपस्थिती होती.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले डॉ.नरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.पल्लवी सोनवणे यांनी मान्यवरांचे तसेच आशा व गटप्रवर्तक यांचे आभार मानले.
एकूण रेखा ठोसर, ज्योती पवार, छाया सोनवणे, गीता पाटील,सिमा राजपुत, सुनिता कणेकर, सुनीता राठोड, ज्योती पाटील,मोनाली चव्हाण, नसीम बानो सय्यद, शीतल चौधरी, सोनुबाई तेली, वंदना सुरवाडे, मंगला चव्हाण आशा एकूण14 आशा व 11 गटप्रवर्तक यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.जि. प.स्थायी समितीमध्ये निवळ झाल्याबद्दल जि. प.सदस्य अमित देशमुख यांचा पंचायत समिती जामनेर व आरोग्य विभागाकडून सत्कार करण्यात आला.
शिवाली देशमुख,अनुराधा कल्याणकर ,प्रदीप पाटील,सुशीला चौधरी, भागवत वानखेडे यांचा त्यांच्या आशास्वयंसेविका यांच्याशी संबंधित कार्या बद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रवींद्र सूर्यवंशी,घृष्णेश्वर पाटील,अनंता अवचार, सुनील पाटील,गोपाळ पाटील,विजय पवार, सुधाकर माळी, सतिष पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विस्डम इंग्लिश मिडी.स्कुल च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांचा जोरदार प्रतिसाद

Next Post

मू.जे.त पाच दिवसीय शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

Next Post

मू.जे.त पाच दिवसीय शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo