Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांच्या मदतीला धावले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विद्यार्थी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांच्या मदतीला धावले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विद्यार्थी

जळगाव- (प्रतिनिधी) – कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छता, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोठी वित्तहानी झालीआहे. त्यामुळे विविध प्राथमिक गरजांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विद्यार्थी कोल्हापूर व सांगलीमधील पुरग्रस्तांच्या मदतीला गेले होते. आठ दिवसात त्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक सलोखासाठी विशेष प्रयत्न केले.

 यवतमाळ जिल्ह्यातील प्रितम नानवटे, प्रणय शेंडे, स्मिता ताठेवार, गोपाल गोफणे, चंदू भिसे, वाशिम जिल्ह्यातील भिकेश भगत, गोरखपूर येथील आखिक सिद्दीकी, केरळमधील झिष्णू मोन पी या विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जावून स्वच्छता अभियान, बाधित घरांमधील लोकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यवतमाळ येथील सावित्रीबाई ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील टिम बरोबर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी मदतकार्य केले. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत विविध खेळ खेळून त्यांचे मनोबल वाढविले. कोल्हापूरसोबतच सांगली जिल्ह्यातील सावळवाडी, माडवाडी, हरीपूर, सिद्धार्थनगर, कवटेगुलंद, कवटेपिरंद, जयसिंगपूर, जुनेखेडे, नवेखेडे, बोरगाव याठिकाणी या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून संसारपयोगी साहित्यांमधील वाया गेलेले व उपयोगी साहित्यांची विभागणी करून घरातील गाळ, पाणी बाहेर काढण्यास मदत केली.

13 गावांना पिण्याचे पाणी पोहचविले

महापूर असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना घशाला मात्र कोरड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात शुद्ध पाणी मिळेनासे झाले. अन्न पाण्यावाचून गावकऱ्यांना उपाशी रहावे लागत होते. दरम्यान दररोज 10 हजार लिटर पाणी पोहचविण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. यात घालवाड, मुकजाड, शितभटा, आवटवाडा, शिर्टी, आलस, कुरंदवाडा, कुंटवाडा, कोठर्डी, अर्जूनवाडा, चिंचवा, उदगाव, शिरोड या गावांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पाण्यासाठी वादाचे प्रसंगही घडले त्यावर मात करीत त्यांनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले.

प्रशासनालाही केले सहकार्य

कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना शासनासह काही सामाजिक संस्थांकडुन मदतीचा ओघ सुरू आहे. मदत वाटपाठिकाणी झुंबड उडून सामाजिक अशांततेचा प्रश्न निर्माण होत असताना गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी शासन व नागरिकांमध्ये समन्वय राखण्यासाठी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोलणे हेच आत्मविश्वासाचे गमक

Next Post

जामनेर येथे आपले सरकार केंद्र धारका कडून ग्राहकांची लूट

Next Post

जामनेर येथे आपले सरकार केंद्र धारका कडून ग्राहकांची लूट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo