जळगाव – (प्रतिनिधी) – मु. जे महाविद्यालय जळगाव येथील रसायनशास्त्र विभागातील बीएससीच्या विद्यार्थ्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने मृदा व जल तपासणी प्रयोगशाळा ममुराबाद येथे दि. १८ आगस्ट २०२५ पासून आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माती व पाणी परीक्षणाबाबत तसेच विविध प्रकारच्या परिक्षण यंत्रांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी भारताच्या गतिशील व जलद प्रगतीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले.

तसेच कृषी विभागात असलेल्या स्वयंरोजगाराच्या योजना देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगितल्या. कार्यक्रमात त्यांनी विज्ञानाधारित शेती करिता माती व पाणी परीक्षण याचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. प्रयोगशाळेतील पर्यवेक्षक श्री दिगंबर पवार, श्री देविदास भगत यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मु. जे. महाविद्यालय सहायक प्राध्यापक सौ.सोनल उपलपवार यांनी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.मु. जे महाविद्यालय जळगाव येथील रसायनशास्त्र विभागातील बीएससीच्या विद्यार्थ्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने मृदा व जल तपासणी प्रयोगशाळा ममुराबाद येथे दि. १८ आगस्ट २०२५ पासून आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माती व पाणी परीक्षणाबाबत तसेच विविध प्रकारच्या परिक्षण यंत्रांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येईल. सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी भारताच्या गतिशील व जलद प्रगतीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. तसेच कृषी विभागात असलेल्या स्वयंरोजगाराच्या योजना देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगितल्या. कार्यक्रमात त्यांनी विज्ञानाधारित शेती करिता माती व पाणी परीक्षण याचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. प्रयोगशाळेतील पर्यवेक्षक श्री दिगंबर पवार, श्री देविदास भगत यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन मु. जे. महाविद्यालय सहायक प्राध्यापक सौ.सोनल उपलपवार यांनी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.











