Saturday, July 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

महाराष्ट्रदिना निमित्ताने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे दि. १- कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळुन जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा असे आवाहन नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल, सोनवणे, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड,अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आश्वस्त करणारे आहे. आपण लवकरच कोरोनाला हरविणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती देखील श्री शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून ठाणे जिल्हावासियांना केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

Next Post
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo