Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगांव शहर स्वच्छतेचे तिन-तेरा-लोकप्रतिनिधी घेताय बघ्यांची भुमिका

जळगांव(प्रतिनीधी)- शहरातील अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यात शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा, शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे बाजारपेठांतील व्यापारी आणि शाळांतील विद्यार्थ्यांना आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता यांसह अनेक समस्यांचा डोंगर उभा राहत असून यात शहरातील अस्वछतेची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. मात्र या समस्येला महानगरपालिकेसह शहरातील उघड्यावर कचरा टाकणारे नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. शहरातील काही भागात साचलेला आणि कुजलेला कचरा उचलण्याची गरज वाटत नसल्याने शहरात यामुळे येत्या दिवसांत आणखी आजारांचा आणि साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेरही कचरा साचत असून, तोही उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगांव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी शहरातील काही भागात स्वच्छता केली जाते. व अन्य ठिकाणी मात्र, महिन्यातून एक वेळेस स्वच्छता केली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा तक्रारी वारंवार नगरपालिकेत देऊनही नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचा म्हणणं आहे.

  शहराच्या स्वच्छतेबाबत मनपा ठरतेय असमर्थ

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जळगांव शहर महानगरपालिकेने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली असली तरी स्वच्छताविषयक कामात ठोस अशी कामगिरी पालिकेला बजावता आलेली नाही. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हे केवळ सांगण्यापुरते असून प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. प्लास्टिकमुक्ती कागदावरच आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एकदिवसीय स्वच्छता महोत्सव साजरा झाला खरा, मात्र प्रत्यक्षात हा स्वच्छतेचा देखावा असून दिव्याखाली अंधारच आहे.जळगांव शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक संस्था, संघटना हिरिरीने सहभागी झाल्या. महापालिकेची यंत्रणा तर कित्येक दिवसांपासून याच कामात आहे. तसेच राजकीय पक्षही या मोहिमेत उतरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शहरात ‘स्वच्छतेचा महाउत्सव’ पार पडल्याचे चित्र किमान या दिवशी तरी दिसून आले. “स्वच्छ शहर सुंदर शहर” मुद्दा डोळय़ांसमोर ठेवून महापालिकेने अनेक उपक्रम राबवले. त्याचा कितपत उपयोग झाला, याविषयी खात्रीने सांगता येणार नाही. कारण, आजही स्वच्छतेच्या नावाने शहरभर ओरड कायम आहे. स्वच्छतेच्या विषयावरून नागरिक समाधानी नाहीत. आरोग्य व स्वच्छतेच्या कामावर नियुक्त करण्यात आलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी निर्ढावलेले आहेत. शहरात एकीकडे काही सामाजिक संघटना स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवत शहरातील अस्वच्छतेच्या समस्येविरुध्द लढत आहेत. मनपा प्रशासनाला मात्र शहरातील समस्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

शाळकरी मुलांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण 

पोटच्या जीवाला शाळेत दाखल करताना पालक निश्चिंत असतात. त्यांना विश्वास असतो की आपल्या पाल्याला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत; पण जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या बर्‍याच शाळांचे मात्र तिन-तेरा वाजले असून त्या स्वच्छतेच्या बाबतीत असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या बर्‍याच शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केल्यावरही शाळा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांची तक्रार आहे. विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून गटारी तुंबल्याने स्वच्छतागृहात प्रवेश करणेही कठीण झाले आहे. 

लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त

एका सुजाण नागरिकाने निवडून आलेल्या स्थानिक लोकप्रतिनीधीला कचऱ्याचा समस्यांबाबत फोन केला असता त्यांनी सांगितलं की आमदार साहेब प्रचारात व्यस्त असल्याने त्या कचऱ्याची सफाई २४तारखेनंतर होईल. असे केविलवाणं उत्तर देऊन आपल्या अंगावरची जबाबदारी ढकलून मोकळे झाले आहेत .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प.सदस्य पदमसिंह पाटील व समाधान पाटील यांच्या नेतृत्वात किशोर आप्पांच्या प्रचारार्थ रॅली-आप्पांना मतदान करण्याचे केले आवाहन

Next Post

जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

Next Post
जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

जितेंद्र(रवी) देशमुख यांना सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद, रवी देशमुख यांचे मतदार संघात पारडे जड दिसण्याच चित्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo