Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरु युवा केंद्रातर्फे खंड स्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

चोपडा-(प्रतिनिधी) – जळगाव येथील नेहरू युवा केंद्र संगठन यांच्या वतीने तालुका समन्वयक निलेश बाविस्कर आणि आकाश कोळी यांनी चोपडा या ठिकाणी आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम हा अमरसंस्था संचालित आदिवासी मुलांचे वसतिगृह वेले इथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. व्ही. पी.चौधरी सर (माध्यमिक उपशिक्षक कन्या विद्यालय चोपडा)होते. त्यांनी युवकांना निर्मल भारत स्वच्छ भारत विषयावर उजेड टाकत सांगितले की स्वच्छतेची सुरुवात घरापासून करावी. आई स्वच्छतेची प्रतीक असते.मनापासून आपले घर आणि दार स्वच्छ ठेवत असते आणि कुणाला बोलत पण नाही.ह्या विचारातून आपण स्वयं स्वच्छता अंगिकारली पाहिजे.आणि स्वच्छता करण्यास आपण शाब्दिक नको तर कृतीतून सहभाग घ्यावा.तसेच त्यांनी मुंबई मनपा आयुक्त यांचेकचरा व्यवस्थापन चे उदाहरण दिले. गड किल्ले स्वच्छता याची माहिती आणि उदाहरण दिली.
पुढील कार्यक्रम 1 दिवसीय शिबिर स्वरूपात असतो.एकूण चार व्याख्याते होते. नंतर श्री. राजेश चौधरी सर (उपशिक्षक संर गुरुंजी विद्यालय वडती) यांनी युवकांना जलयुक्त शिवार तसेच एक भारत श्रेष्ठ भारत या दोन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.तसेच श्री.मयुरेश्वर रोहिदास सोनवणे (उपशिक्षक बालमोहन विद्यालय चोपडा) यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय युवकांना समजावून सांगितला त्यांचे समाजावरील परिणाम आणि महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला शेषराव पाटील( संचालक अमरसंथा वसतिगृह वेले) निलेश पाटील जितेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम ने करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मानाच्या कुस्तीचे मानकरी-माऊली जमदाडे,भारत केसरी कोल्हापुर

Next Post

आडगाव येथील तरुणाचा पाटचारीत पडून मृत्य

Next Post

आडगाव येथील तरुणाचा पाटचारीत पडून मृत्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo