Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2022
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

पाचोरा (प्रतिनिधी) -येथील विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा यांचेतर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विवेक वर्धिनी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी भा.ज.पा. तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कै. माणिकराजे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी माणिकराजे ट्रस्टचे सचिव ॲड. योगेश पाटील, संचालक प्रा.रवींद्र चव्हाण, विवेक वर्धिनी पतसंस्थेचे व्यवस्थापक धर्मेश अग्रवाल, गिरणाई पतसंस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पतसंस्थेचे कर्मचारी सतीश जाधव, अमोल शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सिद्धांत पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी विवेक वर्धिनी पतसंस्थेतर्फे प्राथमिक विद्यामंदिरातील 90 मुला-मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे विद्यालयातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अमोलभाऊ शिंदे यांनी छान छान गोष्टी सांगून मुलांशी हितगुज केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एल. कुंभार यांनी प्रास्ताविक व आभार प्रकटन केले. ज्येष्ठ शिक्षक आर.ओ. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमराज पाटील, विजय पाटील, अभिषेक लांडगे, कल्पना पाटील, मनीषा चव्हाण, प्रणाली टोणपे, दांडेकर मॅडम व राकेश पगार यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

Next Post

पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post
पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo