Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोरा भडगाव रोटरी क्लब पदग्रहण समारंभ उत्साहात

पाचोरा रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.अमोल जाधव
तर सेक्रेटरीपदी गोरख महाजन

पाचोरा- (प्रतिनिधी)-येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव चा पदग्रहण समारंभ दिनांक 15 जुलै रोजी आशीर्वाद हॉल, भडगाव रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रो. मोहन पालेशा व उपप्रांतपाल रो. विकास पाचपांडे उपस्थित होते.

रोटरी वर्ष 2022 23 च्या अध्यक्षपदी रो. डॉ. अमोल जाधव तर सेक्रेटरी पदी रो. डॉ. गोरख महाजन यांची निवड झाली होती. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. डॉ.बाळकृष्ण पाटील व सचिव रो. डॉ. पंकज शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदभार सोपवला. माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली.

मावळते सेक्रेटरी रो.डॉ. पंकज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मावळते अध्यक्ष रो. डॉ बाळकृष्ण पाटील यांनी गतवर्षाच्या कामगिरीचा आढावा उपस्थितांच्या समोर सादर केला. रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष डॉक्टर अमोल जाधव यांनी आगामी वर्षाचा संकल्प व संभाव्य उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपप्रांतपाल रो. विकास पाच पांडे यांनी प्रांतपाल रोटेरियन डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या संदेशाचे वाचन केले. मुख्य अतिथी माजी प्रांतपाल रो. मोहनजी पालेशा यांनी ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले.

या पदग्रहण समारंभ प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा भडगाव ची 20 सद्स्यीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावर्षी नवीन दहा सदस्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. योगेन्द्रसिंह मोरे प्रा. राजेंद्र चिंचोले व सौ वैशालीताई सूर्यवंशी या मान्यवरांचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. उपस्थित पत्रकार व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या परिवाराचाही आयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला.

रो.प्रा शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सेक्रेटरी रो.गोरखनाथ महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो. भरत सिनकर, रो. निलेश कोटेचा, रो चंद्रकांत जी लोढाया, रो.अतुल शिरसमणे, रो. शैलेश खंडेलवाल, रो. रावसाहेब पाटील, रो. रुपेश शिंदे, रो. राजेश मोर ,रो प्रदीप पाटील ,रो. डॉ अजय परदेशी, रो डॉ मुकेश तेली, रो. नरेश गवांदे, रो. डॉ. प्रशांत पाटील ,रो डॉ पवन पाटील, सुयोग जैन, आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

Next Post

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ८८ जागांसाठी भरती सुरू

Next Post
भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ८८ जागांसाठी भरती सुरू

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड येथे ८८ जागांसाठी भरती सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo