Thursday, May 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2026
in जळगाव, विशेष
भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जळगाव, दि. 28 (जिमाका ) : अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे २७ मे २०२६ रोजी भवरखेड, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.

सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) यास खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रंगेहात पकडले. तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील वसा (फॅट) वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा पंच भवरखेडेचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपी सोमनाथ आनंदा माळी हा लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. त्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दि. २९ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से. तसेच सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार व आकाश बोहाडे यांनी सहभाग घेतला.

परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

Next Post
अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo