Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुपारीच्या व्यसनामुळे जडला कर्करोग; डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उद्या हाडांचा ठिसूळपणा तपासणीसाठी मोफत शिबीराचे आयोजन

जळगाव(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून सुपारीचे व्यसन जडलेल्या ५८ वर्षीय शंकुतलाबाईंच्या मुख कर्करोगावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उठता-बसता सुपारी खाण्याची सवय आणि गेल्या अनेक वर्षांपासून मिसरीने दात घासण्याची सवय असलेल्या शंकुतलाबाईंच्या तोंडात फोड झाला, त्याचे रुपांतर गाठीत झाले. परिणामी गिळण्यास त्रास व्हायला लागला, तोंडात जळजळही होत होती, तात्पुरते घरगुती उपाय करण्यात आले. मात्र तोंड उघडणेही अवघड होवून बसले. ह्यामुळे शंकुतला चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे यांच्यासह शल्यचिकित्सक डॉ.तनुज पाटील यांनीही रुग्णाची पार्श्वभूमी जाणून घेत तपासणी केली.

याशिवाय ही सर्व लक्षणे मुख कर्करोगाची असू शकतात यासाठी रुग्णालयातील लॅबमधून तुकड्याची तपासणीही करुन घेण्यात आली. तसेच सीटी स्कॅन, सोनोग्राफी आदि चाचण्याही झाल्यात. याद्वारे हा मुख कर्करोगच असल्याचे निदान झाले असून तो चौथ्या स्टेजवर होता, यामुळे रुग्णाच्या जिवीतास देखील मोठा धोका निर्माण झाला होता. तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल असे चव्हाण यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांची संमती घेतल्यावर महात्मा जनआरोग्य योजनेत प्रकरण मंजुरीस टाकण्यात आले आणि मंजुरी मिळताच शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुखकर्करोगाच्या शस्त्रक्रियेला कमांडो ऑपरेशन असे म्हटले जाते, यात रुग्णाचा जबडा काढून त्याठिकाणी छातीचे मास काढून लावण्यात येते, ह्या प्रक्रियेला सहा ते साडे सहा तासांचा कालावधी लागतो. ही शस्त्रक्रिया सर्जन डॉ.तनुज पाटील, डॉ.विक्रांत वझे यांनी केली असून त्यांना भुलतज्ञ टिममधील डॉ.अग्रवाल, डॉ.शीतल, डॉ.रुतुराज आदिंची सहकार्य लाभले. पंधरा दिवसानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण बरा झाल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्‍त केले.

मुखात चट्टे, जखम झाल्यास दुर्लक्ष करु नका शंकुतलाबाईंना सुपारीच्या व्यसनांमुळे कर्करोग झाल मात्र शस्त्रक्रियेने त्या बर्‍या झाल्यात, मात्र कुठल्याही प्रकारचे व्यसन हे शरिरास घातकच असते. अनेकदा मुखात चट्टा पडतो, फोड येतो किंवा जखम होते, त्यावर तात्पुरते उपचार करुन दुर्लक्ष केले जातात. मात्र असे झाल्यास यात आठ, दहा दिवस वाट न बघता तात्काळ तज्ञांचा सल्‍ला घेऊन तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन लवकरच आजाराचे निदान होऊन उपचार करता येतात.

डॉ.तनुज पाटील, शल्यचिकित्सक

Team Satymev Jayate

Previous Post

मयत शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी समिती गठीत; न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघ न्यायालयात धाव घेणार

Next Post

दिल्‍ली परेडची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या तज्ञांकडून तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo