<
“एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी संबंधित बांबींची योग्य रीत्या पूर्तता करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले, आ. सतीशअण्णा पाटील यांना लिंबू पाणी देवून उपोषण सोडवले”
एरंडोल(प्रतिनिधी) – एरंडोल पारोळा तालुक्यात दुष्काळी अनुदान व बोंड अळीचे 33 टक्के कपात केलेली रक्कम परत मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर जनहिताच्या मागण्यांसाठी आमदार डॉक्टर सतीश पाटील हे आपल्या समर्थकांसह 5 ऑगस्ट पासून येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते.
यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना निवेदनात असे म्हटले होते की गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण कर्ज माफी संदर्भात शेतकर्यांना सहकारी बँकेकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवीन वीज मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ बंद करावी याही मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला होता. दुपारी 03:30 वाजता समक्ष एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी संबंधित बांबींची योग्य रीत्या पूर्तता करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन देवून लिंबू पाणी देवून उपोषण सोडवलं त्यामुळे कार्यकर्ते व सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.