<
जळगाव – (जिमाका) – जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.
यापैकी 270 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 471 इतकी झाली आहे.