<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कुलगुरूंना कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये त्रुटी सुधारण्यासाठी निवेदन देण्यात आले. यात विद्यापीठाने घोषित केलेला निकाल पाहता ९०% विद्यार्थी हे अनुत्तीर्ण आहेत.
तसे पाहता यूजीसी मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास असे होणार नाही असे वाटते. तेव्हा कुठल्या निकषावर हा निकाल घोषित केला आहे, यात संभ्रम आहे. दिलेल्या निकालात तोंडी परीक्षा झाली नसून कोणत्या तर्काच्या आधारावर ५०, २०गुणांपैकी सरासरी ३गुण, ५गुण व १०गुण दिलेले आहे. विद्यार्थ्यांना योग्यरित्या गुण देण्यात यावे. जेणेकरून पुढील सेमिस्टरात विद्यार्थ्यांचे विषयांचे ओझे कमी होईल. एकूण विद्यार्थी निकालाची पाहणी केल्यास असे आढळून येते की, विद्यापीठाने मागील सत्राचे समान गुण या सत्रात दिले आहे. पण ते सर्व गुण सर्व विषयांना समान रित्या वितरीत केल्यामुळे अनेक विद्यार्थी मागील सत्रात उत्तीर्ण असूनही या सत्रात अनुउत्तीर्ण आहेत. काही विदयार्थ्यांना या सत्रसाठी दिलेले गुण पूर्णतः अतार्किक आहेत. हा निकाल असाच राहिल्यास येणाऱ्या सत्रात विद्यार्थ्यांवर पडणारा भार हा न झेपणारा असेल. परिणामी या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळाला तरी पुढील सत्रातील भार त्यांच्या वर्षाचे नुकसान होईल. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सीईटी मार्फत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश विलंबनाने झाल्याने त्यांना पहिल्या सत्रात अभ्यासासाठी खूप कमी वेळ मिळतो. त्यांना या नवीन पॅटर्नची ओळख नसते. म्हणून ते विषयात अनुउत्तीर्ण होतात. त्यांच निकषावर द्वितीय सत्रात मार्क देणे, हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. सोबत विधी शाखेतील एक कमिटी नेमून या प्रकरणावर विचार विमश करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा. अश्या आशयाचे निवेदन कबचौ उमवीचे कुलगुरू यांच्यासमवेत माहितीसाठी ना.मुख्यमंत्री, ना.शिक्षणमंत्री,ना.राज्यपाल यांना देतेवेळी ऍड अभिजीत रंधे, निलेश जाधव, रोहन महाजन, अमोल राठोड, अंकित चव्हाण, रोहित देशमुख, आदित्य भैसने आदी विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.