जामनेर प्रतिनिधी-अभिमान झाल्टे
भारतीय संविधानाचा अपमान केल्याबद्दल प्रविण विठ्ठल तरडे यास तात्काळ अटक करुन त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शरद बाविस्कर तसेच प्रसिद्धी प्रमुख बाळू वाघ यांनी लेखी निवेदनाद्वारे जामनेर येथील तहसीलदारांकडे केली आहे .
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,प्रवीण विठ्ठल तरडे ( मुळशी पॅटर्न – दिग्दर्शक अभिनेता ) या व्यक्तीने संविधानाच्या प्रतीवर वर गणपती बसवण्याचा फोटो फेसबुक द्वारे प्रसारित केला .
या प्रकारातून भारतीय संविधानाची पायमल्ली झाली असून संविधानाचा अपमान झाला आहे .
संविधानाचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी .
अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे .