Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा घटतोय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा घटतोय

जिल्ह्यातील प्रकल्पात 31.76 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
• जिल्ह्यातील हतनूर धरणात 17.73%, गिरणा 33.31%, तर वाघूर धरणात 62.66% उपयुक्त पाणीसाठा
• तीन मोठ्या प्रकल्पात 13.25 टीएमसी, तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, तर 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा
• सुकी आणि भोकरबारी मध्यम प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा अधिक उपयुक्त साठा


जळगाव, (जिमाका) दि. 6 – पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून जुलैचा पहिला आठवड्यातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा 16.01 टीएमसी म्हणजेच 31.76 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 39.95 टक्के इतका म्हणजेच 8.19 टक्के इतका अधिक होता. असे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात अवघा 13.25 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 1.60 टीएमसी, गिरणा 6.16 टीएमसी तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.60 टीएमसी (17.73%) गिरणा धरणात 6.16 टीएमसी (33.31%) तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी (62.66%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 66.77%, मंगरुळ 46.17%, सुकी 72.21%, मोर 54.02%, तोंडापूर 41.93%, बहुळा 19.93%, अंजनी 19.31%, गुळ 26%, मन्याड 17.47% तर भोकरबारी धरणात 15.12% उपयुक्त साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुकी आणि भोकरबारी धरण क्षेत्रात यावर्षी साधारण पाऊस झाल्याने या धरणातील साठा हा मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकावरुन दिसून येते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाक कान घसा शिबिरातून गरजू रूग्णांना मिळाला दिलासा पहिल्याच आठवडयात ९ शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

विभागीय लोकशाही दिनाचे 12 जुलै रोजी आयोजन

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

विभागीय लोकशाही दिनाचे 12 जुलै रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo