<
रावेर/ता.प्रतिनिधी-दि.23 विनोद कोळी
“पर्यावरणाचा मित्र तोच खरा वसुंधरेचा पुत्र!!” ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित व विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांत संलग्नित किलबिल अकॅडमी रावेर या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालक यांना प्रधानाचार्य सौ.नयना निलेश पाटील यांच्या हस्ते एक विद्यार्थी एक रोप देण्यात आले. प्रत्यक्ष रोप लावून त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी अथवा संकल्प विद्यार्थी व पालकांनी केला.
कार्यक्रमामध्ये पालकांसोबत परिसरातील अनेकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आदरणीय महिला उद्योजिका सौ.ज्योती ताई देवरे,आरोग्यदूत सौ. जयश्री रमेश पाटील पर्यावरण प्रेमी सौ.उज्वला संजय सोनवणे,सौ.संगीता दत्तात्रय वरणकर, सौ.स्वाती जयंत पाटील, कुमारी गौरी सुभाष सैतवाल व शिक्षिका उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आदरणीय दादासो. श्री सोपान नामदेव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांना रोपे वाटप करण्यात आली.
दरवर्षी शाळेच्या माध्यमातून पर्यावरण विषयातील विविध अभियान व उपक्रमांची कार्यक्रमांची आखणी होत असते, याहीवर्षी कोरोनाच्या या महामारीत ऑक्सिजनची कमतरता रुग्णांना भासत होती; म्हणूनच या उपक्रमांची परिसरात प्रशंसा होत आहे. छोट्याशा लहान मुलांना पर्यावरणाचा हा संस्कार भविष्यातील पर्यावरण प्रेमी घडवतील हे नक्की.