<
अमळनेर-(प्रतिनिधी) – दि. ४ सप्टेंबर २०२१ – दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस सबंध भारतात सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी हा दिवस दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीमध्ये साजरा केला जातो, देशात1992 पासुन राजीव गांधी सद्भावना पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
या महान व्यक्तीच्या कार्याची सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने भारत सरकारच्या निर्देशानुसार श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी अंमळनेर संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने दि. २० ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवाडा “सामाजिक ऐक्य पंधरवाडा” म्हणून साजरा करण्यात आला.
याचे औचित्य साधून दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी, सकाळी ११ :०० ते १२:३ ० वा. गुगल मिट App. वर ऑनलाईन वेबिनार च्या माध्यमातून व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याता म्हणून प्रताप (स्वायत्ता ) महाविद्यालय, अमळनेर, येथील प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी, यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक, अभिजित भाऊ भांडारकर, रासेयो विभाग पारोळाचे विभागीय समन्वयक, प्रा. डॉ. जगदिश सोनवणे , रासेयो विभाग चोपडा विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. एस. पाटील, हे उपस्थित होते.
तसेच ५५ व्यक्तींनी सहभाग नोंदवला. प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी, यांनी आपल्या व्याख्यानातून सद्भावना दिनाचे महत्त्व असे सांगितले की, सामाजिक ऐक्य हे व्यक्तीच्या मनातील विचारांवर अवलंबून असतात., राष्ट्राविषयी, समाजाविषयी आणि ग्रामीण जनतेविषयी असलेली सामाजिक भावना, ही समाजकार्य करत असताना अतिशय उपयुक्त असते. व्यक्तीने भारताचे नाव लौकिक करण्यासाठी जगले पाहिजे, राष्ट्राचा ध्वज कुठेही दिसला तरी त्याचा सन्मान केला पाहिजे, रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीतात संपूर्ण भारताचा उल्लेख करून ज्या पद्धतीने गुण गायले आहेत, त्याच पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी कार्य केले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त असावी, राष्ट्राविषयीची अस्मिता जागृत करण्यासाठी सद्भावना दिन व सामाजिक ऐक्य हे अतिशय महत्त्वाचे आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, यांनी राजीव गांधीच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या स्मारक स्थळाला वीरभूमी का म्हणतात या विषयी मार्गदर्शन केले, राष्ट्रीय सद्भावना व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची भूमिका किती महत्वपूर्ण असते, हे अतिशय विश्रुतपणे मांडले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक व सूत्र संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. डॉ. भरत खंडागळे, प्रा. डी आर ढगे, डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. चंद्रशेखर बोरसे, प्रा.डॉ. श्वेता वैद्य, प्रा.डॉ. अनिता खेडकर, प्रा. उदय महाजन (ग्रंथपाल), श्री अनिल वाणी (कार्यालयीन अधिक्षक) व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सुप्रिया बोरसे, अश्विनी पवार, तेजस पारधी, सुप्रिम पाटील, सविता बिऱ्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.