<
जळगांव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आजी आजोबांसाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. आजचा एक दिवस आजी आजोबांसाठी म्हणून साजरा करण्यात आला. त्यात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीला मुलांकडून आजी आजोबांचे औक्षण करुन स्वागत केले. तसेच त्यांचे पाय धुवून त्याना नमस्कार करीत स्वतः बनवलेले ग्रीटिंग्स दिले.आजी आजोबा देखील आपल्या नातवांसाठी वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. व या उपक्रमात सहभागी झालेत. त्यात आजीनी रांगोळी काढत तर आजोबांनी नृत्य करत सहभाग नोंदवला. सगळ्यानी संगीत खुर्चीत सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना शाळेचे चेअरमन सौ.अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी सर यांच्या हातून पारितोषिक देण्यात आले. जाताना प्रत्येक आजीआजोबांच्या चेहऱ्यावर भरभरून हास्य होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रसिद्ध उद्योगपति शरदचंद्र कासट, शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी सर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर,सतीश पाटील,गुणवंत पवार व प्रोजेक्ट हेड सुवर्णा पवार यांनी परिश्रम घेतले.