<
जळगाव दि.३१- आय एम आर महाविद्यालयात हे एच.आर.मिट आणि इंडस्ट्री अकॅडमिक इन्स्ट्राॅ क्शन उपक्रमात बोलताना औरंगाबाद येथील एन्ड़ोन्स टेक्नॉलॉजीचे कॉर्पोरेट एच.आर.डॉ. राजेश जवळकर यांनी 21 व्या शतकातील विद्यार्थी हा केवळ नोकरीभिमुख नसावा तर करिअर भिमुख असावा अशी या जागतिकीकरणाच्या काळातील व्यावसायिक जगाची अपेक्षा आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी सज्ज राहा असे आवाहन विद्याथी व उपस्थित प्राध्यापकांसमोर केलं. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले सध्याची व्यावसायिक आणि औद्योगिक परिस्थिती बघता १९५० ते १९७०न च्या काळातील लायसन्स राज नंतरचे १९७० ते १९९० च्या काळातले युनियन राज संपुष्टात येऊन सध्या एम्पलोयी राज सुरु आहे .त्यामुळे तुमचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता बरोबरच तुमची अटीट्युड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे .सेलर्स -बायर्स किंवा बायर्स- सेलर ही बिझनेस स्ट॒ट्रजी बदलून अनिश्चितता ही एकमेव कायम स्ट॒ट्रजी असणार आहे. आणि कोणत्याही अनिश्चिततेला तुम्ही कसे सामोरे जाता हे फार महत्त्वाचे असल्याने नोकरीत दोन पंच (थंब इम्प्रेशन )आणि एक लंच पॉलिसी अजिबात चालणार नाही. एम्पलोयी राज् असल्याने औद्योगिक आणि व्यावसायिक प्राधिकरण कंपन्यांनी आपला सहकाऱ्यांच्या सोयीसुविधा आणि कामाच्या जागा संशोधन त्यांच्यासोबत मोठी आव्हाने यावर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळेच योग्य प्रवृत्ती आणि बुद्धिमत्ता यांचा मेळ घालून पुढे जा असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी मंचावर खान्देश कॉलेज एज्युकेशनचे सदस्य ज्येष्ठ उद्योगपती हरीश मिलवानी, सुनील सुतवणे, जनरल मॅनेजर एच.आर. आणि ऍडमिनिस्ट्रेशन गरवारे पॉलिस्टर लिमिटेड दीपक चौधरी ,कंट्री हेड हाल्डेक्स इंडिया प्रमोद पारुळेकर उपाध्यक्ष ऑपरेशन लीग्रांड जळगाव तसेच आय एम आर च्या संचालक प्राध्यापक डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. तसेच आय एम आरच्या वार्षिक व्यवस्थापन चे प्रकाशन देखील करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी केले त्या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना तुमच्या योग्य प्रवृत्ती विकसित करा. संस्था तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते .पण तुम्ही किती आत्मसात करता यावर तुमचा विकास अवलंबून आहे असे हे आवर्जून सांगितले. त्यानंतर सुनील सुटवाने यांनी व्यावसायिक औद्योगिक स्पर्धा आणि आईस्बेर्ग मॉडेल याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करताना दृश्य आणि अदृश्य घटना आणि परिमाणे लक्षात घेऊन स्वतःला घडवत रहा. तुमचे स्किल आणि ज्ञान हे द्रष्टा परिणाम असले तरी तुमची स्वप्रतिमा योग्य वृत्ती आणि त्याच्या खुणा आणि तुमचे हेतू हेसुद्धा महत्त्वाचे ठरते .उदाहरणादाखल त्यांनी मारुती सर्व्हिस स्टेशनच्या एडव्हरटाइज् विषयी सांगितलं .तुमची योग्य प्रवृत्ती कौशल्य आणि क्षमता या तुमच्या कामाच्या ठिकाणी वेळोवेळी तपासल्या जातील हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले त्यानंतर लीग्रांड उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत असून पुढील वीस वर्षे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आपली अर्थव्यवस्था ही निर्यातप्रधान अर्थव्यवस्था नाही त्यामुळे तसेही आपल्या काळजी करायचे कारण नाही आपण मजबूत अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जगात सातव्या स्थानावर आहोत जॉब जाण्याची भीती बाळगू नका स्वतःला नोकरीसाठी राईट पर्सन म्हणून सिद्ध करण्याची तयारी करा .त्यासाठी योग्य उमेदवार ठरवायचे असेल तर तसेच कामाची संस्कृती जोपासा असे त्यांनी सांगितले या उपक्रमाचे सूत्रसंचालन ममता दहाड व पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ.पराग नारखेडे यांनी केले.