Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘जलशक्ती अभियान’ यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘जलशक्ती अभियान’ यशस्वीतेसाठी कार्यशाळा संपन्न-जलस्त्रोतांची अद्यावत माहिती तयार करण्याच्या जिल्हाधिकारी ढाकणे यांच्या सूचना

बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जळगांव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एल.एम.शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, उपविभागीय कृषी अधिकारी बी.जी.व्यवहारे, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे ,सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरीतसेच सर्व संबधित विभागाचे अधिकारी, जलसंधारणाचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरीक व शेतकरी उपस्थित होते

जळगाव – जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांसह चोपडा आणि बोदवड या तालुक्यातील पारंपरिक पाणीयोजना, बारव, विहिरी आणि विंधनविहीरी, बंधारे, तळे, ट्रेंच आदींची अद्यावत माहिती तयार करुन त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जल शक्ती अभियान (JSA) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, पाल ता.रावेर येथे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यावल, रावेर, चोपडा व बोदवड तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झालेली घट याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उपस्थित अधिकारी व जलसंधारणाच्या कार्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाच्या संचालक तथा अभियनाच्या समन्वयक फरीजा महेबुब नाईक, केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तरित्या हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. पांरपारीक जलस्त्रोत, विहीरी, पाझर तलाव, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन आदी कामांवर अभियानात भर दिला जाणार आहे. या अभियानामुळे भविष्यात यावल व रावेर तालुक्यातील पाणी समस्या दूर होणार असल्याने, यामध्ये स्थानिकांना सहभागी करुन घ्यावे. शासनाकडून अनुदान मिळेल आणि त्यानंतर काम सुरु करण्याची पध्दत बदलून, अधिकाऱ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा वापर करुन कामे पूर्ण करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी, अशाप्रकारच्या अभियानातून जलसंवर्धनाबाबत लोकजागृती करुन पुढील पिढीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था निर्माण करावी असे सांगितले. अभियनाच्या समन्वयक श्रीमती फरीजा महेबुब नाईक यांनी अभियानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करुन केंद्र सरकारकडून आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे यांनी अभियानाची एक जुलैपासून देशभरात सुरुवात झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यशाळेत त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अभियानाचा उद्देश व साध्य करावयाचे उद्दीष्ट याबद्दल माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जळगावात पत्रकार संघ व नजर फाउंडेशन च्या वतीने ६८५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

सावधान..! तुम्ही तळलेल चिकन खाताय का? हे तुम्हाला महागात पडू शकते..! विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ-शहरात हात गाड्यांवर विकलं जातेय दुर्गंधीयुक्त, सडलेलं चिकन..!

Next Post
सावधान..! तुम्ही तळलेल चिकन खाताय का? हे तुम्हाला महागात पडू शकते..! विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ-शहरात हात गाड्यांवर विकलं जातेय  दुर्गंधीयुक्त, सडलेलं चिकन..!

सावधान..! तुम्ही तळलेल चिकन खाताय का? हे तुम्हाला महागात पडू शकते..! विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ-शहरात हात गाड्यांवर विकलं जातेय दुर्गंधीयुक्त, सडलेलं चिकन..!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications